Aurangabad

‘घनवन‘ प्रकल्पांतर्गत वृक्षरोपणास प्रारंभ

‘घनवन‘ प्रकल्पांतर्गत वृक्षरोपणास प्रारंभ

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : कमीत कमी जागेत जास्तीत-जास्त झाडांची लागवड हा जपानच्या मातीतून आलेली ‘मियावाकी घनवन प्रकल्प‘ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात साकारणार आहे. अवघ्या अर्धा एकर जागेत सहा हजार झाडांची या अंतर्गत लागवड करण्यात येणार तर प्रत्यक्ष वृक्षारोपणास आज सुरुवात करण्यात आली असून कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते वृक्षारोपणास बुधवारी सुरुवात करण्यात आली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारणार आहे. या प्रकल्पात ‘इकोसत्व एन्हार्यमेंट सोलूशन्स‘ ही संस्था मदत करण्यात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, इकोसत्व‘च्या संचालक नताशा झरीन, रासेयो संचालक डॉ.टी.आर.पाटील, ग्रॅड मास्टरचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद केळकर, भारत अभियानच्या प्रकल्प अधिकारी आम्रपाली त्रिभुवन, प्रकल्प व्यवस्थापक सिध्दार्थ इंगळे, प्रेम राजपूत आदींची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button