Faijpur

धनाजी नाना महाविद्यालयात धनोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

धनाजी नाना महाविद्यालयात धनोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

सलीम पिंजारी

धनाजी नाना महाविद्यालयात धनोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन निमित्याने पारंपरिक वेशभूषा, वक्तृत्व , वादविवाद,काव्यवाचन निबंध स्पर्धा, केश रचना, नेल आर्ट, मेहंदी, व रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांनी कै. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून केली.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत काठेवाड,आदिवासी बिरसा मुंडा,तुकाराम महाराज,वारकरी संप्रदाय, बंगाली बाबू ,घड वाहणाऱ्यांचा ग्रुप, मच्छीमार कोळी बांधव,बीजनेस मॅन, वेस्टर्न लूक मॉडेलिंग – पेशवाई बाईचे लूक, झाशीची राणी, बाळासाहेब ठाकरे, कन्नड अन्ना ,गुजराथी ,केरळातील मुस्लिम बांधव वेशभूषा,भगत सिंग,लेडी कमांडो,पंजाबी, काशीबाई, या प्रकारच्या विविध वेशभूषा केल्या त्यामधून विद्यार्थांनी सामाजिक एकात्मता दाखविली.

धनाजी नाना महाविद्यालयात धनोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

सुसंस्कृत धनाजीयन, राष्ट्र निर्मितीसाठी: तरुण, मूल्य संवर्धन काळाची गरज या विषयावर निबंध लेखन, मी भारताचा नागरिक, जगा आणि जगू द्या संदर्भ कोरोना विषाणू, संर्वांगिण विकासाचे साधन : शिक्षण या विषयावर वकृत्व स्पर्धा, सोशल मीडिया शाप की वरदान या विषयावर वाद-विवाद सर्धा, स्वरचित काव्य वाचन इ.स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. याप्रसंगी परीक्षक म्हणून डॉ. जगदीश पाटील, डॉ. सिंधू भंगाळे, डॉ. कल्पना पाटील उपस्थित होते.रांगोळी स्पर्धेत पुलवामा, स्त्री शक्ती, धनाजीयन, बेटी बचाव बेटी पढाव अशा प्रकारच्या विविध विषयांवर विद्यार्थांनी रांगोळी काढली.

धनाजी नाना महाविद्यालयात धनोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

पारंपारिक वेशभूषा, केश रचना नेल आर्ट मेहंदी व रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ जयश्री नेमाडे, प्रा वंदना बोरोले यांनी पाहिले व विविध स्पर्धेच्या आयोनासाठी महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य प्रा डॉ ए आय भंगाळे, प्रा डॉ उदय जगताप, प्रा डी बी तायडे, प्रा ए जी सरोदे,स्नेहसंमेलन प्रमुख प्रा राजेंद्र राजपूत, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ गोपाळ जी कोल्हे, क्रीडा प्रमुख डॉ गोविंद मारतळे , वक्तृत्व,वादविवाद, काव्यवाचन स्पर्धा संयोजक प्रा सतीश पाटील, प्रा वंदना बोरोले,डॉ जयश्री नेमाडे,प्रा विवेक महाजन, प्रा राजू पटेल प्रा नरेंद्र वाघोदे , प्रा दीपक पाटील प्रा जयश्री पाटील, प्रा कविता भारुडे, प्रा अर्चना वऱ्हाडे प्रा भावना पाटील व महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button