Amalner: शहरात नकली नोटांचे रॅकेट उघडकीस..! काही वर्षांपूर्वी नकली नोटा आल्या होत्या चलनात..!
अमळनेर येथील पैलाड भागात नकली नोटा चलनात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापूर्वी एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हदीत एका तरुणास बनावट नोटा छापण्याच्या माशिनिसह छापा टाकत अटक केल्यानंतर आता अमळनेर शहरातील एका परिसरात नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता पैलाड भागात घडली.
याबद्दल सविस्तर माहिती अशी कि, पैलाड भागात दोन जण नकली नोटा चलनात आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथक लागलीच या भागात पोहोचले. एका टेलरिंगच्या दुकानाजवळ दोन जण संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. कैलास शिवराम भोया (२८, रा. बलसाड, गुजराथ) व वसंत कालसिंग मलकाशा (वय २२ रा कावडझिरी जि.अमरावती) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांची चौकशी केली असता दोघांच्या खिशात ५०० रुपयांच्या १० हजाराच्या नकली नोटा आढळून आल्या आहेत.बनावट नोटा, मोटरसायकल व दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. उपनिरीक्षक अनिल भुसारे, रवींद्र पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे.
काही वर्षांपूर्वी अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणात नकली नोटा चलनात आल्या होत्या. आणि आता खूप वर्षानंतर पुन्हा नकली बनावट नोटांच अस्तित्व समोर आले आहे.






