Delhi

?धक्कादायक…वादग्रस्त निर्णयाचा निषेध ! महिला न्यायाधीशांना महिलेनेच पाठवले कंडोम

?धक्कादायक…वादग्रस्त निर्णयाचा निषेध ! महिला न्यायाधीशांना महिलेनेच पाठवले कंडोमनवी दिल्ली – मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पुष्पा गानेडीवाला यांनी पॉक्सो कायद्यावर दिलेल्या एका निर्णयावरून वाद निर्माण झाला होता. गानेडीवाला यांनी त्यांच्या निर्णयात असं म्हटलं होतं की, मुलीने कपडे घातलेले असताना तिच्या छातीला स्पर्श करणं हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नाही. त्यांच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती. आता अहमदाबादच्या एका महिलेनं त्यांच्या निर्णयाचा निषेध म्हणून कंडोमची पाकिटं पाठवली आहेत. महिलेनं न्यायाधीश पुष्पा यांच्या पत्त्यावर 150 कंडोम पाठवली असून त्याचं कारणही सांगितलं आहे.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या देवश्री त्रिवेदी यांचे म्हणणे आहे की, त्यांनी न्यायाधीश पुष्पा यांच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरी आणि कार्यालयात कंडोमची 150 पाकिटे पाठवली आहेत.देवश्री यांनी म्हटलं की, न्यायाधीश पुष्पा यांच्या मते जर त्वचेला स्पर्श केला नाही तर ते लैगिंक शोषण नाही. मी त्यांना कंडोम पाठवून हे सांगितलं आहे की, याचा वापर केल्यास त्वचेला स्पर्श होत नाही, तर याला काय म्हटलं जाईल? यासोबत एक पत्रही पाठवलं आहे. यामध्ये निर्णयावर आक्षेप नोंदवला असून न्यायाधीश गानेडीवाला यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिफारस घेतली मागेन्यायाधीश गानेडीवाला या मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पॉक्सो कायद्यांतर्गत दोन निर्णय दिले होते त्यावरून वाद निर्माण झाला होता. यातच सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 20 जानेवारीला न्यायाधीश पुष्पा यांची उच्च न्यायलयाच्या स्थायी न्यायाधीशपदासाठी शिफारस केली होती. वादग्रस्त निर्णयानंतर ही शिफारस मागे घेण्यात आली होती.दोन वादग्रस्त निर्णयन्यायाधीश पुष्पा गानेडीवाला यांनी लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची सुनावणी करताना दोन निर्णय दिले. ते दोन्ही निर्णय वादग्रस्त ठरले. यामध्ये एक प्रकरण 12 वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाचं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, कपडे न काढता तिच्या छातीला स्पर्श करणं पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नाही. तर दुसऱ्या निर्णयात म्हटलं होतं की, मुलीचा हात पकडून पँटची चेन उघडणं हेसुद्धा पॉक्सोअंतर्गत गुन्हा ठरत नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button