महावीर पतसंस्थेतील गैरकारभारामुळे अनेकांचा ठेवी काढण्याच्या ओघ सुरूच
चोपडा – लतीश जैन
चोपडा महाराष्ट्रभर जळगाव जिल्ह्याचे नाव पतसंस्था डबघाईच्या कारणाने गाजलेले आहे जिल्ह्यातील ठेवीदार अनेक वर्षांपासून शासनाच्या दारी वणवण भटकत आहे ठेवीदारांना आपल्या पैशांसाठी शासनाच्या दरबारी खेट्या माराव्या लागत आहे असे असतांना देखील शासनाचे कोणतेही ठोस धोरण नसल्याने जिल्ह्यातील पतसंस्थांवर नियंत्रण नाही आजही अनेक पतसंस्था डबघाईस आल्या असल्या तरी शासनच याला जबाबदार म्हटलं तर वावगं ठरणार नाही ठेवीदारांच्या पैशांवर संचालक मंडळातील काही जण मजा मारत असतात आणि बाहेर मात्र पतसंस्था चालविण्यासाठी काय कष्ट करावे लागतात ? असे आव आणतात तरी अश्या पतसंस्था चालकांवर लवकर कारवाई व्हावी आणि सत्य मुखवटा समाजा समोर यायला हवा असे अनेकांना वाटत आहे परंतु मांजराच्या गळ्यात घंटा बांधेल कोण ? असा यक्ष प्रश्न समाजा समोर येत आहे शहरातील महावीर पतसंस्थेच्या गैरकारभारामुळे पतसंस्थेतुन लाखो रुपयांचा ठेवी ठेवीदार काढून घेऊन गेले व आजही ठेवी काढण्याचा ओघ सुरूच आहे तरीही मात्र सर्वच कुंभकरणाची झोप घेत आहे ? असे शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे मागील काही महिन्यातच लाखो रुपये ठेवी निघाल्याचे बोलले जात आहे सुरळीत चालणारी संस्थेतेला गालबोट लावण्याचे काम काही कर्मचारीनीच केले आहे असेही गावात बोलले जात आहे काही कर्मचारीनी तर संचालक मंडळाला हाताशी धरून आम्ही सर्व धुतल्या तांदुळाचे असा आव आणला परंतु तो आव त्यांच्याच माथी पडला संस्था डबघाईस येऊन गेली तो पर्यंत संस्थाचालकांना का लक्षात आले नाही हेही एक मोठे कोडे आहे.पदाचा स्त्री हट्ट व चापलुसी करणारे काही कर्मचारी हट्ट पूरविताना संस्था डबघाईस येईल याचे भान देखील सस्थाचालकांना राहिले नाही मात्र कालांतराने आपली फटफजिती झाल्याचे कळले देखीलही परंतु वेळ गेल्यावर ….! संस्थाचालकानी करोडो रूपयांच्या घेतलेल्या कर्जाची वसुली होऊन ठेवीदारांना न्याय मिळावा हीच रास्त अपेक्षा …!






