Bollywood

तू माधुरी दे आम्ही परत जाऊ..पाकिस्तानी सैनिकाच्या या मागणीला शहीद विक्रम बत्रा यांनी दिलं होतं हे चोख उत्तर…

तू माधुरी दे आम्ही परत जाऊ..पाकिस्तानी सैनिकाच्या या मागणीला शहीद विक्रम बत्रा यांनी दिलं होतं हे चोख उत्तर…

बॉलिवूडमध्ये प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्तीवर आधारीत एकतरी चित्रपट प्रदर्शित होतो. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘शेरशाह’ १२ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे.
यावर्षी आपण देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीय जवानाने आणि सैनिकाने दिलेल्या बलिदानाची आणि पराक्रमाचीआठवण करून देतो. सध्या कोरोनाच्या काळात असलेल्या बंधनामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा दिवस साजरा करण्यात आला.
आता या चित्रपटामुळे विक्रम बत्रा यांच्या युद्धातील एक किस्सा सध्या चर्चेत आला आहे.

चित्रपटातील या सीनमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा हे त्यांच्या टीमसोबत पॉइंट ४८७५ साठी लढत होते. या सीनमध्ये एका पाकिस्तानीने युद्ध सुरु असताना विक्रम बत्रा यांच्याकडे एक विचित्र मागणी केली.

कॅप्टन विक्रम यांचा भाऊ विशालने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितले आहे. त्यांनी सांगितले की पाकिस्तानी लष्कर विक्रम यांच्या या मिशनमध्ये सारखे अडथळे निर्माण करत होते आणि त्यांना धमकावत होते.
पाकिस्तानी सैनिक विक्रम यांच्याशी रेडिओवर संपर्क साधत त्यांना आव्हान देत होता. तो पाकिस्तानी म्हणाला, ‘अरे शेरशाह, इथे येऊ नकोस, नाही तर तुझे नुकसान होईल. त्यावेळी विक्रम यांना खूप राग आला की एक पाकिस्तानी त्यांना कसे आव्हान देऊ शकतो? तेव्हा विक्रम म्हणाले, तिथेच रहा, आम्ही एका तासात तिथे पोहोचत आहोत.
यावर लगेच पाकिस्तानी म्हणाला, ‘तुला माहित आहे का, आम्ही तुला मारण्यासाठी येत आहोत आणि तुझ्या आवडत्या अभिनेत्रीला घेऊन जाऊ.’तो पाकिस्तानी पुढे म्हणाला, ‘अरे आम्हाला माधुरी दीक्षित दे, अल्लाहची शपथ घेतो, आम्ही सगळे लगेच इथून निघून जाऊ.

पाकिस्तानीच्या या मागणीवर कॅप्टन विक्रम बत्रा त्याला सडेतोड उत्तर देत म्हणतात, माधुरी दीक्षित तर दुसऱ्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत, सध्या याच्यावरच काम चालव.’
विक्रम चालत राहिले आणि त्यांनी शत्रूंचे सगळे बंकर उडवून लावले आणि म्हणाले ‘माधुरी दीक्षितकडून तुमच्यासाठी ही भेट आहे.’

यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा यांनी पाकिस्तानीवर हल्ला केला. असे म्हटले जाते की ज्या पाकिस्तानीने विक्रम बत्रा यांच्याकडे माधुरी दीक्षितला त्यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली होती. त्याला त्यांनी गोळ्या घातल्या आणि त्याआधी ते त्या पाकिस्तानीला म्हणाली, ‘घे बाळा माधुरी दीक्षितची ही भेट तुझ्यासाठी आहे.’असे चोख उत्तर दिले होते.

चित्रपटातील हा सीन प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडला आहे. ‘शेरशाह’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. असंही म्हटलं जातं की, ‘विक्रम यांचे कुटुंबीय चित्रपटातील मुख्य भूमिकेत सिद्धार्थलाच पाहू इच्छित होते कारण सिद्धार्थ आणि विक्रम यांच्या चेहऱ्यामध्ये बरंच साम्य आहे.यात कियारा अडवाणी देखील काम करत आहे.

 

संबंधित लेख

Back to top button