रावेर

उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांतकार्यालय) लवकरात लवकर दुरुस्त करावे ययासाठी बैठक

उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांतकार्यालय) लवकरात लवकर दुरुस्त करावे ययासाठी बैठक

फैजपूर-यावल रावेर तालुक्याचा मानबिंदु असलेला फैजपुर उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांतकार्यालय) हे
गेल्या सात वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने फैजपुर येथे मंजूर केले होते यावल रावेर तालुक्यातील
जनतेसाठी हे मध्यवर्ती ठिकाण फैजपुर शहाराच्या बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे.या कार्यालयामुळे यावल-रावेर तालुक्यात शैक्षणिकदृष्टया शिक्षणाचे माहेरघर असलेल्या फैजपुर शहरात जवळपास रावेर -यावल तालक्यातील जवळपास पाच हजार विदयार्थी शिक्षण घेत आहे. तसेच न्यायालयीन कामकाजासाठी व विविध प्रकारचे दाखले मिळण्यासाठी व आपल्या परिसरातील शासन दरबारी विविध निवेदन देवुन शासन दरबारी आपल्या समस्या मांडण्यासाठी
उपविभागीय कार्यालय शहरात असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी त्वरीत सोडविण्यात येत
होत्य आता सध्या असे समजते की,फैजपुर येथील उपविभागीय कार्यालया साठी शहरात
शासकीय जागा मिळत नसल्याने सावदा येथे जाण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत.

तरी फैजपुर शहराची मानबिंदु कमी न होऊ देण्यासाठी जागेला पर्यायी मार्ग काढण्यासाठी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरीक यांची बैठक आज दि.३० ऑक्टोंबर २०१९ बुधवार रोजी संध्याकाळी ५ वा. कृषी उत्पन्न बाजार समिती फैजपुर च्या सभागृहात आयोजित केली आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,भाजपा शहाराध्यक्ष संजय रल,काँग्रेस शहराध्यक्ष शे.रियाज शे.साबीर ,शिवसेनाशहराध्यक्ष अमोल निंबाळे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष अन्वर खाटीक यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button