Amalner

Amalner: इंटरनॅशनल आयसीएन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत आर्यन बारस्करने मिळवले यश

Amalner: इंटरनॅशनल आयसीएन बॉडी बिल्डिंग स्पर्धेत आर्यन बारस्करने मिळवले यश

अमळनेर मुंबई येथे झालेल्या इंटरनॅशनल आयसीएन बॉडीबिल्डिंग स्पर्धेत
अमळनेर शहरातील राजमुद्रा फाऊंडेशन संचलित अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशनचा आर्यन बारस्कर ने तिसरे पारितोषिक पटकावून यश मिळविले आहे.

मुंबई येथे २७ मे २०२३ रोजी झालेल्या इंटरनॅशनल आयसीएन बॉडीबिल्डिंग या स्पर्धसाठी अमळनेर शहरातील राजमुद्रा फाऊंडेशन संचलित अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आर्यन बारसकर या तरुणाने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्याला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. अश्या प्रकारच्या स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिक मिळवणारा तो अमळनेर शहरातील प्रथम बॉडीबिल्डर आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. आर्यनचा सत्कार अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे यांनी केला.यावेळी सिद्धांत पाटील, मयूर बारसकर, विठ्ठल पाटील इ उपस्थित होते. आर्यन हा संगीता संगीता बारस्कर यांचा मुलगा असून संपूर्ण कुटुंबाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button