Nashik

राज्यात येऊ घातलेल्या मोठे उद्योग प्रकल्प गुजरातला,येवल्यात शिवसेनेचे आंदोलन

राज्यात येऊ घातलेल्या मोठे उद्योग प्रकल्प गुजरातला,येवल्यात शिवसेनेचे आंदोलन

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक- महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी येत असलेले मोठमोठे प्रकल्प गुजरात राज्यात हलवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ येवला शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने येवला तहसिल आवारात शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने व आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी ५० खोके एकदम ओके, ५० खोके महाराष्ट्राला धोके अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

यांनी घेतला सहभाग

यावेळी जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, झुंझारराव देशमुख, तालुकाप्रमुख रतन बोलणारे, शिवसेना शहर संघटक राहुल लोणारी, तालुका सोशल मिडीयाप्रमुख मकरंद तक्ते, उपपतालुका प्रमुख चंद्रकांत शिंदे, युवा सेना तालुकाप्रमुख अरुण शेलार, शहर सोशल मिडीयाप्रमुख मोहफिजभाई अत्तार, विजय गोसावी, लक्ष्मण गवळी, मा. सभापती प्रविण गायकवाड, छगन आहेर, मा. उपसभापती पुंडलिक पाचपुते, सुखदेव भोरकडे, मनोज रंधे, शरद पवार, दिपाली नागपुरे, कमळाबाई दराडे, संजय सालमुठे, निंबा फरताळे, चंद्रमोहन मोरे, प्रतिक जाधव, मयूर भांबारे, अशोक अव्हाड, भावराव कुदळ यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. ५० खोके… एकदम ओक्के

यावेळी ५० खोके एकदम ओके तसेच ५० खोके महाराष्ट्राला धोके लिहिलेले खोके घेऊन शिवसैनिकांनी आंदोलन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. गुजरात राज्याच्या होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील फॉसकॉन आणि वेदांतासारखे मोठे उद्योग प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्याचा आरोप केला. तसेच बघ्याची भूमिका घेणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचाही निषेध केला. तालुकाप्रमुख रतन बोरणारे, भास्कर कोंढरे यांचीही मनोगते झाली. सदर घटनेच्या निषेधार्थ तहसिल आवारात युवा सेनेने सह्यांची मोहीम राबविण्यात आली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button