फैजपूरशहरात आज पासून तीन दिवसाच्या जनता कर्फ्यू सुरू
सलीम पिंजारी
फैजपूर ता यावल 13 जुलै
येथील नगर प्रशासनाने गेल्या दोन दिवसापूर्वी नगरपालिकेमध्ये जनता कर्फ्यू बंद बाबत एक बैठक प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित केली याप्रसंगी शहरात दिनांक १४ ते २० जुलै असा आठवडा जनता कर्फ्यू म्हणून कडकडीत बंद करण्याचे निर्णय घेण्यात आला होता.
मात्र या निर्णयाला व्यापारी बांधव, शहरवासीय व सर्वपक्षीय नागरिकांमधून असंतोष होता या बाबी रविवार रोजी कृषी उत्पन्न उपबाजार समिती फैजपूर आवारात सोशल डिस्टन व माक्स लावून समस्त व्यापारी,लोकप्रतिनिधी, शहरवासीय सर्वपक्षीय नागरिकांच्या उपस्थितीत एका तात्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आले यात ७ दिवसा ऐवजी ३ दिवस बंद साठी सहमती झाली.
यानुसार सदर विषया प्रति व्यापारी बांधव व शहरवासीयांनी आपल्या समस्या मुख्याधिकारी ,यांच्या कडे आज दिनांक १३ जुलै रोजी लेखी निवेदनाद्वारे मांडल्या याप्रसंगी नपा सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये व्यापारी बांधव व शहरवासियांनी ७ दिवसाच्या बंद ऐवजी ३ दिवस बंद साठी सहमती दर्शवली यावर सर्वांच्या सहमतीने मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिनांक १४ ते १६ जुलै सलग तीन दिवसांचा जनता कर्फ्यु घोषित केला आहे यामध्ये सर्व अति महत्वाची दुकाने सुरू राहतील यात दवाखाने,मेडिकल,दूध व कृषी दुकाने, वगळता सर्व बंद राहील, मात्र या बाबी व्यापारी व समस्त शहरवासीयांनी कोविड १९ च्या प्रशासनाच्या सर्व आदेशानुसार कटाक्षाने पालन करावे सदर बाब ही ३ दिवसानंतर ही नेहमी साठी प्रत्येकाने अंगीकारली पाहिजेत असे आवाहन केले
सदर निवेनाच्या प्रति फैजपूर प्रांताधिकारी, तहसीलदार यावल, मुख्याधिकारी, यांना देण्यात आल्या.
याप्रसंगी व्यापारी तथा नपा विरोधी पक्षनेते शेख कुर्बान शेख करीम,नगरसेवक कलीमखान मणियार,माजी उपनगराध्यक्षा राकेश जैन, माजी नगरसेवक शेख जफर मेंबर, महेबुब पिंजारी, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अंनवर खाटीक, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज शेख साबीर, वाल्मिकी समाज शहराध्यक्ष संजय ,व्यापारी असोशिएशन पदाधिकारी,संजय सराफ युवराज चौधरी ,बाळू वाढे ,सुरेश सिंह परदेशी, बंटीभाऊ आंबेकर, ,पिंटू भाऊ तेली, पिंटूभाऊ मंडवाले , गिरीश पाटील , शेख शाकीर ,जीवन पाटील , कुंदन झांबरे ,कुंदन फिरके, प्रदीप पाटील, चंद्रकांत वाढे, तेजेद्र साळी, महेंद्र धांडे, भूषण चौधरी, प्रदीप पाटील, दिव्यांग सेनेचे नितीन महाजन नाना कामगार संघटनेचे मलक शाकिर, कबीर मिस्तरी युवक काँग्रेसचे शेख मुदस्सर, वसीम जनाब, राजेश कुकरेजा, अब्दुल रज्जाक, चिराग गुजराथी ,कैलास बालाणी ,शेख जाबीर, एजाज खान हर्षल दाणी, शेख जावेद, कांतीलाल चौधरी ,श्रीकांत माहुरकर यासह व्यापारी असोशियन व राजकिय पक्ष, पदाधिकारी कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.






