sawada

चित्त थरारक कसरती नंतर नऊ जणांना वाचवण्यात सावदा पोलिसांना यश स्थानिक जिगरबाज देवदूत बनुन धावले

चित्त थरारक कसरती नंतर नऊ जणांना वाचवण्यात सावदा पोलिसांना यश स्थानिक जिगरबाज देवदूत बनुन धावले

सावदा प्रतिनिधी दिनांक 18 रोजी 3 सोमवारी च्या दुपारी तीन वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगरच्या नऊ जणांना गारबर्डी धरण परिसरात फिरणे चांगले चांगलेच अंगलट आले आहे.पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने हे नऊ तरुण नदीपात्राच्या मध्यभागी अडकून पडले होते. त्यामुळे त्यांच्या जीवावर बेताली होती,परंतु गारबर्डी व पाल येथील स्थानिक नागरिक यांनी या नऊ युवकांची सुखरूप सुटका केली आहे सुमारे सहा तासाचा चित्त थरारक कसरतीनंतर यांना वाचवण्यात यश आले आहे. याचं सर्वस्वी श्रेय स्थानिक नागरिक व सावदा पोलिसांना जाते स्वतःचा जीव टांगणीला लावून स्थानिक नागरिकांनी या तरुणांना वाचवले आहे यावेळी परिसरातील सर्व अधिकारी वर्ग घटनास्थळावर उपस्थित होते

दरम्यान दुपारी तीन वाजता हे नऊ जण आपल्या मोटर सायकल द्वारे गारबर्डी धरणावर फिरायला आले होते. तीन वाजेपर्यंत गारबर्डी धरण भरले नसल्याने या बहाद्दरांनी थेट नदीपात्रात उतरत मोज मजा केली परंतु अचानक सातपुडा डोंगरागा मध्ये झालेल्या पावसामुळे नदीपात्रात मोठा पाण्याचा प्रवाह आला प्रवाहात नदीच्या मध्यभागी हे तरुण अडकून पडले स्वतः निघण्यासाठी कसरत केली परंतु ते शक्य होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर युवकांनी स्थानिक यांच्याशी आरडाओरडा करत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गारबर्डी तांड्यावरील एकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने माहिती धरणावरील पहरेदार महावीर भिलाला याच्याकडे दिली याने संपूर्ण माहिती आपल्या जलसंपदा अधिकारी शाखा अभियंता अजय जाधव यांना व त्यांनी कार्यकारी अभियंता बरे यांना कळवली त्यानंतर संपूर्ण जिल्हा प्रशासन अलर्ट झाले व संपूर्ण जिल्ह्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली संध्याकाळी साडेसात वाजता सावदा पोलिस घटनास्थळावर दाखल झाले स्थानिक आदिवासी बांधव खिरोदा येथील नागरिक यांच्या सहकार्याने दोराची जमवाजमव करावी केली साडे सात ते अकरा वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन चालले व या नऊ जणांची सुटका झाली

रात्रीचा काळ कुठचा अंधार पावसाचं पाणी मुख्य रस्त्यापासून साधारणता दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या ठिकाणावर सर्वांना पायी जावे लागले त्यामुळे रस्त्यात साप विंचू अजगर यांचे दर्शन देखील वाचवायला आलेल्या पोलीस प्रशासनाला झाले पाण्याचा प्रवाह वाढतच होता पाल खिरोदा येथून दोरखंडाची जमवाजमव करून स्थानिकांनी अतिशय धाडसीने मोठ्या पाण्याच्या प्रवाहात उतरून अतिशय धाडसाने या सर्व नऊ पर्यटकांना एक एक करत बाहेर काढले

सावदा पोलिसांचं कौतुकास पात्र कार्य

गारबडी धरण सावदा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्याने सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डीडी इंगोले पीएसआय समाधान गायकवाड व त्यांचे सहकारी सर्वात आधी घटनास्थळी पोचल्यावर रात्रीच्या अंधारात पर्यटकांना कसे वाचवायचे या रेस्क्यू ऑपरेशन ची रचना करण्यात आली या पर्यटकांना वाचल्यानंतर सावदा पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था मेडिकल व्यवस्था व नंतर त्यांना मुक्ताईनगर येथे रात्री सुमारे तीन वाजता त्यांच्या प्रत्येकाच्या घरी सोडून देण्यात आले

आदिवासी बांधवांनी दिले त्यांच्या अंगावरील कपडे

मुक्ताईनगर येथील पर्यटक सुखी नदीपात्रात सुमारे सहा तास अडकून पडले होते पाण्याच्या प्रवाहामुळे व सहा तास पाण्यात अडकल्यामुळे मानसिक स्थिती व शारीरिक स्थिती खालावली होती बाहेर काढल्या नंतर त्यांना खूप थंडी वाजत होती त्यामुळे गारबडी तांडा येथील आदिवासी बांधवांच्या घरातील व मुलांच्या अंगावरील सर्व चे सर्व कपडे काढून यांना देऊन आदिवासी बांधवांनी मोठे माणुसकीचे दर्शन घडवले आहे

रस्त्यात साप व अजगर

गारबडी धरणाच्या मुख्य रस्त्यापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या सुखी नदीपात्रात जाण्यासाठी बचाव कार्याला मोठा अडथळा निर्माण होत होता या रस्त्यात चार नाले येत असल्यामुळे त्या नाल्यांना देखील कमरेवर पाणी साचले होते पाण्यातूनच वाट काढत पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळावर दाखल झाले यावेळी रात्रीच्या काळाकुट्ट अंधारात मिळेल त्या बचाव कार्यातील कर्मचारी घटनास्थळावर जाण्यासाठी रस्ता शोधत होते दरम्यान रस्त्यात अजगर व साप दिसल्याने बचाव कार्याची एकच तारांबळ उडाली

एकनाथ खडसे प्रशासनाच्या संपर्कात

मुक्ताईनगर चे नऊ तरुण असल्याने माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस प्रशासन यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून होते व बचाव कार्यासाठी जी लागेल ती व्यवस्था करा परंतु नऊ तरुणांचे जीव वाचवा यासाठी देखील लक्ष ठेवून होते तर रोहिनी खडसे यांनी प्रशासनासह त्या सर्व आदिवासी बांधवांचे धाडसी कामगिरी बद्दल आभार मानले आहे

सुकी धरणाच्या सांडव्याच्या खाली नदी पात्रात अडकलेली व सुटका झालेली व्यक्ती

1 अतुल प्रकाश कोळी 20
2 विष्णू दिलीप कोलते १७
3 आकाश रमेश धांडे २५
4 जितेंद्र शत्रुघ्न कूंडक ३०
5 मुकेश श्रीराम धांडे १९
6 मनोज रमेश सोनावणे २८
7 लखन प्रकाश सोनावणे २५
8 पियूष मिलिंद भालेराव २२
9 गणेशसिंग पोपट मोरे २८
सर्व रा मुक्ताईनगर

वाचविणारे स्थानिक
१ इम्रान शहा रतन शहा रा. पाल
२ संतोष दरबार राठोड रा.पाल
३ रतन भंगी पावरा रा.गारखेडा
४ तारासिंग रेवलसिंग पावरा रा.गारबर्डी
५ सिद्धार्थ गुलजार भिल
6 गोविंदा चौधरी खिरोदा
7 महावीर बिलाला

सहकार्य
स्थानिक आमदार शिरीष चौधरी, रावेर तहसील टीम, सावदा सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय इंगोले पी एस आय समाधान गायकवाड व त्यांचे सहकारी रावेर पोलीस स्टेशन टीम, प्रांत फैजपूर, अधिकारी व कर्मचारी, पत्रकार पंकज पाटील कोचूर येथील कमलाकर पाटील शाखा अभियंता अजय जाधव खिरोदा येथील गोविंदा चौधरी

काळजाचा ठोका चुकवणारे कसरती

या नऊ मुलांना वाचवण्यात मोठ्या अर्थळ्याची शर्यत करावी लागली कमरेला दोर बांधून मोठ्या प्रवाहामध्ये उतरत स्थानिक त्या मुलांपर्यंत पोहोचले माने बरोबर च्या पाण्यात कमरेला दोर बांधून स्थानिक तीन ते चार तास पाण्याचा उभे होते अडकलेल्या तरुणांच्या कमरेला दोर बांधल्यानंतर ही दहा ते पंधरा जणांनी त्यांना प्रवाहातून बाहेर काढण्यासाठी ओढावे लागत होते एवढा पाण्याचा प्रवाह मोठा होता

एकच जल्लोष

स्थानिकांनी व पोलिस प्रशासनाने या तरुणांना वाचल्यानंतर संपूर्ण रेस्क्यू टीम बाहेर निघाल्यावर आदिवासी बांधवांनी एकच जल्लोष केला

दरम्यान गारबडी धरणावर पाण्याचा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर असून कुणीही पर्यटकांनी पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये असे आव्हान सावदा पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button