Nashik

वाठोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.इंदिरा ठाकरे यांची निवड

वाठोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ.इंदिरा ठाकरे यांची निवड

बागलाण । सुशिल कुवर

आज सरपंच पदाच्या निवडणुकीत वाठोडा ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. इंदिरा नामदेव ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये बहुमत मिळवून ह्याची सरपंच पदी निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान बागलाणचे सक्रिय सदस्य असलेले आणि उच्चशिक्षित तरुण सदा बारकू जाधव यांची उपसरपंच पदासाठी निवड झाली आहे. सदस्यपदी सौ. सीताबाई कामडी, सौ. छबीबाई बहिरम, नवनाथ ठाकरे, संजय ठाकरे आणि सौ. सुनीता सूर्यवंशी यांची निवड झाली आहे.

वर्षानुवर्षे प्रस्तावित लोकप्रतिनिधींनी आपले अस्तित्व कायम ठेवले. माहितीच्या अधिकारातून आपली अनियमितता लोकांसमोर उघड करून या निवडणुकीत तरुणांनी सत्ता मिळवली. यावेळी सर्व उमेदवारांनी सर्व तरुण, महिला, पुरुष मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.

सर्वसामान्यांच्या प्राथमिक सोईची पूर्तता आणि सामाजिक हितासाठी सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आहे. या वेळी बोलताना सांगण्यात आले की नेहमी ज्येष्ठांचा आदर करा, विरोधकांचा द्वेष करू नका, असे सांगण्यात आले आहे. नवनिर्वाचित उमेदवारांना गावाच्या विकासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button