Nashik

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी देशासाठी बलिदान दिले चंद्रकांत गवळी.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी देशासाठी बलिदान दिले चंद्रकांत गवळी.

सुनील घुमरे नाशिक

नाशिक : देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जीवाचे रान केले.त्यांनी देशासाठी बलिदान दिले,त्यांचा त्याग भारताच्या जडण घडणीत मोलाचा आहे असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी केले.

दिंडोरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांचे मार्गदर्शन खाली संताजी बोरा इंग्लिश स्कूल वणी येथे आयोजित मुख्याध्यापक सहविचार सभेत मार्गदर्शन करताना गवळी बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर समावेशीत शिक्षण विभागाचे विशेषतज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर,केंद्रप्रमुख किसन पवार,विनय कुमार बिरारी, किशोरलाल बोरा इंग्लिश स्कूल चे ज्ञानेश्वर पोळ ,मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.
यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन,व सरस्वती प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक सहविचार सभेत इयत्ता ५ वी ते ८ वी इयत्तेचे वर्ग सुरू करण्यासाठी शालापूर्व तयारी बाबत सूचना करण्यात आल्या.वर्गाचे निर्जंतुकीकरण,स्वच्छता,विद्यार्थ्यांना मास्क पुरवणे आदी बाबत मुख्याध्यापकांना अवगत करण्यात आले.शिक्षकांची कोवि ड तपासणी बाबत नियोजन करण्यात येऊन सर्व शिक्षकांची चाचणी शाळा सुरू होण्यापूर्वी करून घ्यावी असे मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी,समाज कल्याण विभागाचे विभागाची स्कॉलरशिप,स्थलांतरित विद्यार्थी,शाळा बाह्य विद्यार्थी,सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, स्वाध्याय उपक्रम आढावा,जुने पाठ्यपुस्तक संकलन, शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सेवा सुविधा आदी बाबत चर्चा करण्यात आली.केंद्रप्रमुख किसन पवार यांनी शाळा व्यवस्थापन समिती बैठक घेऊन शाळा सुरू होण्या बाबत नियोजन करावे, कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन पवार यांनी केले.विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी विशेष गरजा असणारी बालके या विषयी माहिती देऊन त्यांचे अध्ययन अध्यापन,सेवा सुविधा,कायदे,या विषयी सखोल माहिती दिली तसेच हे विद्यार्थी शाळा बाह्य राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी गोविंद गिरी,विशेष शिक्षक पौर्णिमा दीक्षित,प्रकाश खैरनार, पोप ट भोये,अंकुश भोजने,एस उफाडे,दत्तू गवळी,नारायण महाले,नंदू महाले,एस पी हिरे,नियाज शेख,विनोद क्षीरसागर,योगेश वडजे,कैलास पवार,मंगला पाटोळे,मंगला देवरे,आरती दुबे,आदी विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button