Amalner

सीए फायनल परीक्षेत हार्दिक सोनारने मारली बाजी, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव…

सीए फायनल परीक्षेत हार्दिक सोनारने मारली बाजी, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव…

अमळनेर : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउटंट इंडियाच्यावतीने (CA) जुलै २०२१ या महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात अमळनेर येथील पत्रकार जयंतलाल वानखेडे यांचा सुपुत्र व श्याम बागुल यांचा भाचा हार्दिक सोनार याने सीए फायनल कोर्स दोन्ही ग्रुपमधून यश संपादन केले.

सीए फायनल परीक्षेला देशभरातून सीए अंतिम जुन्या कोर्समधून पहिल्या ग्रुपसाठी एकूण १२ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती़ त्यापैकी १३४८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे. दुसऱ्या ग्रुपसाठी एकूण १७ हजार ४४ विद्यार्थी बसले होते़ त्यापैकी २१९४ विद्यार्थी पास झाले असून दोन्ही ग्रुपसाठी ३९४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.यंदा सीए परीक्षेत देशभरातून १.५७ टक्के विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले आहे. यात हार्दिक सोनार हा लहानपणापासून सुरत येथे मामा श्याम बागुल यांच्या कडे शिक्षण घेत होता. हार्दिकने कठोर परिश्रम करून त्याने सीए होण्याचं स्वप्न जिद्दीने पूर्ण केलं आहे. त्याने सुरत येथे आपले शिक्षण पूर्ण केले. सुरत येथील नामांकित सीए रवी छावछरीया व वडील पत्रकार जयंतलाल वानखेडे, मामा श्याम बागुल यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. हार्दिक याचे अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अभिनंदन केले. त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button