Parola

? नांदेड येथील चिमुकल्या आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचार केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी…

? नांदेड येथील चिमुकल्या आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचार केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी…

२१/०९/२०२१ रोजी नांदेड जिल्यातील भोकर तालुक्यातील
दिवशी गावातील आदिवासी मन्नेरवारलु जमातीच्या ५ वर्षाच्या चिमुरडीच्या बलात्कार करून निर्घुण हत्या करण्यात आली या घटनेचा जाहिर निषेध करत आहोत.अद्याप मुख्य आरोपी फरार आहे . सशयीत एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे . चिमुकलीच्या बलात्कार प्रकरणामुळे विशेष लक्ष घालुन आरोपीला ताबोडतोड पकडुन महा विकास आघाडीच्या पुरोगामी शासनाने आणलेल्या स्त्री शक्ती कायदा अंतर्गत फाशीची शिक्षा देण्यात यावी. अश्या घटना वारंवार आदिवासी समाजाच्या मुलींवर होत आहे . सांरगखेडा येथील झालेले बलात्कार प्रकरण, रायगड येथील मुलीवर झालेला बलात्कार प्रकरण आणि आता नांदेड जिल्यातील भोकर तालुक्यातील ५ वर्षीय मुलीवर झालेला बलात्कार आरोपीला तात्काळ फाशी व्हावी अशी आम्ही मागणी करतो. आम्ही राज्यशासन पोलिस प्रशासनाला आव्हान करतो की, वारंवार बलात्कार होत आहे. तरी याला आळा बसावा त्यासाठी राज्यसरकारने स्त्री शक्ती कायदा लवकरात लवकर अमलात आणावा अशी आम्ही मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर प्रमोद दाभाडे , पारोळा,सागर रमेश पारधी ,ग्रामपंचायत सद्यस्य महाळपुर,निलेश पारधी, बहादरपुर,आकाश सोनवणे, बहादरपुर,आकाश पारधी, पारोळा,दिपक सोनवणे, महाळपुर,सागर भोई ,ज्ञानेश्वर माळी,गणेश पारधी इ च्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button