Maharashtra

एकांताचे सुख देई मज देवा ! आघात या जिवा चुकवूनि जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज

एकांताचे सुख देई मज देवा ! आघात या जिवा चुकवूनि !- जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

जगामध्ये सध्या कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या महाभयंकर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय करावं हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या कालखंडामध्ये संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सांगायचं झालं तर एका जागेवर बसून आपण संतांनी लिहिलेले ग्रंथ वाचन करू शकता किंवा भगवंताचे नामचिंतन करू शकतो .आणि नामचिंतनाचा फायदा आपल्या जीवनात होऊ शकतो कारण कलियुगातही सगळ्यात सोपी साधना म्हणजे नामचिंतन आहे. आणि हे नाम चिंतनासाठी आपल्याकडे आत्ता भरपूर वेळही उपलब्ध आहे.

संत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध वचनाप्रमाणे मानवी जीवनामध्ये जर आघात चुकवायचे असतील किंवा सुखदुःखाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे असेल, तर संत तुकाराम महाराज म्हणतात

काळ सारावा चिंतने !

एकांतवासीं गंगास्नाने !

देवाचें पूजेने !

प्रदक्षणा तुळशीच्या !

याचा अर्थ असा आहे. चिंतने काळ सारावा कारण एकांतामध्ये मनुष्याला एकाग्र होतायेत एकांतामध्ये मनुष्याला आत्म प्रचीती प्राप्त होते .एकांतामध्ये मानवी जीवन आणि त्या जीवनामधील समस्या याच्यावरील ठोस उपाययोजना आपल्याला एकांतात जाऊन करता येते. म्हणूनच पूर्वीच्या काळी ,ऋषीमुनी असतील, साधुसंत असतील यांनी एकांताचा शोध घेतला याच एकांताच्या शोधामध्ये संतांनी आत्मपरीक्षण केलं स्वतःचं जीवन शोधलं स्वतःचं जीवन शोधण्याची कला, बुद्धीला योग्य निर्णय देण्याची कला, मन एका ठिकाणी स्थिर होण्याची कला, ही फक्त एकांतामध्ये मनुष्याला प्राप्त होऊ शकते. म्हणून अनेक संतांनी एकांतामध्ये साधना केलेले आपल्याला पहायला भेटते. सध्याचा कालखंड देशांमध्ये भयावह विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत आहे .अशाच काळामध्ये स्वतःला जर सुरक्षित ठेवायचा असेल ,स्वतःला जर वाचवायचा असेल ,तर माणसांनी एकांतात राहणं अत्यंत जबाबदारीची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कारण तो एकांत पूर्वीच्या काळी जंगलांमध्ये असायचा ,दऱ्या खोऱ्या मध्ये असायचा , आज आपल्याला हाच एकांत आपल्या घरामध्ये अनुभवायला लागेल, याचं कारण भयावह कोरोना आपल्या दारापर्यंत आला आहे. जर एकांताचा भंग आपण केला .

तर त्या कोरोनाच्या वेढ्यातून आपण वाचू शकणार नाही म्हणून एकांत हा आपल्या जीवनात आवश्यक आहे.

एकांत म्हणजे काय आहे? स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवनातील भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ विसरून एका ठिकाणी बुद्धी स्थिर करणे एका ठिकाणी मन स्थिर करणं, हाच उपाय आपण आपल्या जीवनामध्ये करून या महाभयंकर रोगाला टाळू शकतो. त्यामुळे बाहेर जाणं टाळा घरामध्ये रहा.

|| ठायीच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत कळवावा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button