Mumbai

?Big Breaking…31 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्याची शक्यता..राजेश टोपे यांनी दिला इशारा..

?Big Breaking…31 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्याची शक्यता..राजेश टोपे यांनी दिला इशारा..

महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत 31 मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यावर एकमत झाले आहे. लवकरच यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
तसेच सध्या महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच 18 ते 44 वयोगटाला तुर्त लस मिळणार नाही अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय.

राजेश टोपे म्हणाले तुर्त महाराष्ट्रात 18-44 वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी 20 मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलंय. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील.

45 वरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळं दुसरा डोस देणं गरजेचं आहे. असं असल्यानं महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस ही 45 वर्षांवरील लोकांना दिली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी 20 लाख डोस हवेत. सध्या केवळ 10 लाख आहेत. पहिल्या डोसची लगेच अपेक्षा करू नये. 4-5 दिवसानंतर पहिल्या डोसचा निर्णय घेवू असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

लॉकडाऊन वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार

लॉकडाऊन दरम्यान कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. राज्यातचा लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी बैठकीत झाली. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील,” असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं

– लस उपलब्ध झाल्यावर पत्रकारांसंदर्भात निर्णय घेवू
– लोकल ट्रेन निर्बंध कायम राहतील. १५ तारखेपर्यंत तसा निर्णय होईल
– लॉकडाऊन वाढवण्याचा कल मंत्रिमंडळात दिसून आला.

म्युकर मायकोसीस वाढत आहे
– लॉकडाऊन किमान १५ दिवस वाढवण्यावर चर्चा झाली.मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button