Amalner

Amalner: शहरात आपला दवाखाना सुरू…

Amalner: शहरात आपला दवाखाना सुरू…

अमळनेर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व नगरपरिषद अमळनेर
यांचे संयुक्त विद्यमाने सद्गुरू वाडी संस्थानच्या इमारतीत हिंदू हृदयसम्राट आपला दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले.

अमळनेर शहरात एकूण 6 आरोग्यवर्धिनी केन्द्र मंजुर करण्यात आले असून त्यापैकी पहिल्या दवाखान्याचे 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन अमळनेर येथील सद्गुरू वाडी संस्थान येथिल इमारती मध्ये उदघाटन करण्यात आले. “हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना “नावाने” हे आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होत असून आ. अनिल भाईदास पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व ह.भ.प. बेलापूरकर महाराज यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्यात
आले. या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक श्याम पाटील, मनोज पाटील, वाडी संस्थानचे विश्वस्थ रविकांत देशमुख, तालुका वैदयकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, न.प.चे वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर, न.प.अभियंता दिगंबर वाघ, संजय चौधरी, भाऊसाहेब सावंत, विशाल सैंदाणे, किशोर माळी, प्रसाद शिरसागर, हरीश चौधरी व समस्त
न.प. दवाखाना कर्मचारी उपस्थित होते. 6 वेगवेगळ्या भागात हा दवाखाना सुरू होणार असून याठिकाणी तज्ञ डॉक्टरांची नेमणूक होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button