sawada

सावदा इत्तेहाद एज्यु.सोसा.कडुन वीज चोरी वीज अभियंता सपकाळे यांचे कडे पुराव्यानिशी तक्रार

सावदा इत्तेहाद एज्यु.सोसा.कडुन वीज चोरी

वीज अभियंता सपकाळे यांचे कडे पुराव्यानिशी तक्रार

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

कोरोना महामारी च्या संकटात लोकांचे जिव वाचवण्या करीता आटोकाट प्रयत्न करणारी सरकार व यंत्रणा तारेवरची कसरत करत आहेत. लाक डाउन मुळे सरकार सहीत सर्वांचे रोजी रोटी चे बंद झाल्याने मोठे संकट उभे झाले आहे.
राज्य महा वीज वितरण सुध्दा नुकसानीत आले असता. महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री केंदा कडुन मदत मिळावी या साठी प्रतयत्न शील असल्याच्या बातम्या समोर येत आहे.
अशा संकट काळात सरकार सोबत राहुन हातभार लावणे येवजी उलट अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव ही शाळा ज्या इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी द्वारे चालवली जात आहे या शैक्षणिक संस्थेच्या मालकीच्या जागेवर सावदा येथे गौसिया नगर भागात जवळपास एक वर्षा पासून आर सी सी मध्ये एक इमारत बांधण्याचे सुरू असलेले कामा साठी
रितसर वीज कनेक्शन न घेता वीज चोरी चा घनिष्ठ मार्ग निवडला .
व सरकारी वीज तारां वर खाजगी सर्व्हिस वायर चा आकोडा टाकुन वाटेल त्या वेळी मना प्रमाणे वीज चोरी करण्या चा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बाबत गावातील एका जागृक प्रतिनिधी युसूफ शाह सुपडू शाह यांनी दि. 03/07/2020 रोजी स्थानिक विज वितरण चे कार्यकारी अभियंता श्री. सपकाळे व उप कार्यकारी अभियंता भुषण तळेले यांची समक्ष भेट घेऊन त्यांना पुरावे निशी तक्रार दिली असता त्याच वेळी शहर कक्ष अभियंता श्री. खांडेकर यांना घटना स्थळी पाठवून कारवाई करणे बाबत आदेशित केले असता कर्मचाय्रानी घटना स्थळा पासून तार आकुडे, बोर्ड व मोटर पंप इत्यादी साहित्य जप्त केल्या चे समजते.
वीज वितरण चे अधिकारी कडे पुराव्यानिशी दिलेल्या तक्रारीत अशे म्हटले आहे की संस्थेच्या इमारत बांधकाम करणे कामी जवळपास एक वर्षा पासून मना प्रमाणे वीज चोरी करणाय्रा इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा ता रावेर जि जळगावया शैक्षणिक संस्था पासून मोठा दंड वसूल करण्यात यावा व नियमा प्रमाणे पोलिस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रार दार तर्फे करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button