?धक्कादायक.. दंगल गर्ल…कुस्तीपटू रितिका फोगाटने केली आत्महत्या… 17 वर्षी संपवले जीवन…!क्रीडा विश्वात खळबळ..!कोण आहे जबाबदार..!
जागतीक कुस्तीमध्ये देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणाऱ्या गीता आणि बबिता फोगाट यांच्या यशाची कथा सर्वांना माहिती आहे. लढाऊ वृत्तीच्या या कुटुंबावर एक दु:खाचाडोंगर कोसळला आहे.
क्रीडा विश्वात खळबळजनक घटना उघडकीस आलीय. कुस्तीचा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू रितिकाने आत्महत्या केलीय. रितिका ही बबिता फोगाट, गीता फोगाटची मामेबहीण होती. सोमवारी रात्री बलाली गावात तिने गळफास लावून आत्महत्या केली. मीडिया रिपोर्टनुसार, रितिकाने 12 ते 14 मार्चदरम्यान राजस्थानमधील भरतपूर येथील लोहागड स्टेडियमवर आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर, कनिष्ठ महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता.
अंतिम सामना 14 मार्च रोजी खेळविण्यात आला होता, त्यामध्ये रितिका एका सामन्यात पराभूत झाली. या पराभवानंतर तिला हादरा बसला आणि त्यानंतर 15 मार्च रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास बलाली गावच्या घरात पंख्याला स्कार्फ लावून आत्महत्या केली. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूर गावात राहणारी 17 वर्षीय रितिका पैलवान महावीर फोगाट या कुस्ती अॅकॅडमीमध्ये जवळपास 5 वर्षांपासून सराव करत होती. 53 किलो वजनी गटात राज्य पातळीवरील स्पर्धेत एका पॉईंटने झालेल्या पराभवाने रितिकाला मानसिक धक्का बसला, त्यामुळेच तिने हे धोकादायक पाऊल उचलल्याची चर्चा आहे. यापूर्वी तिने सुमारे 4 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता.
17 वर्षीय रितिकालाही गीता आणि बबिताप्रमाणेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व्हायचे होते. यासाठी तिने रात्रंदिवस कष्ट केले. ती पैलवान महावीर फोगाट या अकादमीमध्ये 5 वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती. यापूर्वीही तिने अनेक सामने खेळले होते. पण तिने कोणता हा सामना गमावला आणि पूर्णतः नैराश्येच्या गर्तेत अडकली आणि तिने आपले जीवन संपवल.
गीता आणि बबीता या स्टार कुस्तीपटूंची मामेबहीण असलेल्या 17 वर्षीय रितिकालाही फोगाट बहिणींप्रमाणे कुस्तीपटू बनायचं होतं. त्यासाठी ती गेली 5 वर्षे तिचे मामा द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगट यांच्या अकादमीमध्ये सराव करत होती. तिने नुकतंच भरतपूरमधील लोहागढ स्टेडियममध्ये झालेल्या राज्यस्थरीय सब-ज्यूनियर आणि ज्यूनियर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव तिच्या जिव्हारी लागला आणि तो सहन न झाल्याने तिने सोमवारी रात्री खोलीतील पंख्याला ओढणी बांधून फाशी घेतली.
रितिकाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केला. रितिकाच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार तिच्या गावी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूरमध्ये करण्यात आलं आहे.
