Nashik

नाशिक जिल्हा रुग्णालयातून 3 दिवसांपूर्वी अपहरण केलेली दीड वर्षांची चिमुकली आज पहाटे सीबीएस वर सापडली, अपहरणकर्त्या पोलिसांच्या ताब्यात

नाशिक जिल्हा रुग्णालयातून 3 दिवसांपूर्वी अपहरण केलेली दीड वर्षांची चिमुकली आज पहाटे सीबीएस वर सापडली, अपहरणकर्त्या पोलिसांच्या ताब्यात

शांताराम दुनबळे नाशिक

नाशिक : नाशिक जिल्हा सामान्य रूग्णालयातुन 3 दिवसांपूर्वी तपासणीसाठी एक महिला नाशिक जिल्हा रुग्णालयात आली असता, तिची चिमुकली झोपलेली असल्याने तिने बाळाला बाकावर ठेऊन ती केस पेपर बनविण्यासाठी गेली होती. नंतर परत आली असता, तिला तिची मुलगी तिथे दिसली नाही, म्हणून तिने शोधाशोध केली. नंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका भामट्याने तिला जिल्हा रुग्णालयातून पळवून नेल्याचे उघडकीस आले.गौरी भोला गौङ वय वर्षे दिङ रा ठाणे मुंबई असे अपहरण झालेल्या बालिकेचे नाव असुन अपहरण झालेली गौरी ही उत्तरप्रदेश येथील असुन आई वङील यांच्या सोबत रबाले परीसर ठाणे येथे रहाते तिची मावशी नाशिक येथे अबंङ एमआयडीसी परिसरात रहात असल्याने मावशी ला प्रसूती साठी संगीता गौङ ह्या बहिणीला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यासाठी आल्या होत्या गौरी गौङ ही झोपी गेल्याने संगीता यांनी गौरी हिस प्रसूती कक्षा बाहेर झोपवले व तेथे बसलेल्या व्यक्तींना लक्ष देण्यात सांगितले, दुपारी एक वाजता सर्व प्रोसीजर झाली असता प्रसूती कक्षा बाहेर गौरी दिसली नाही सर्वञ शोध घेवुन सापडली नाही अखेरीसजिल्हा रूग्णालय प्रशासनास विनंती करून रुग्णालयातील सी सी टि व्ही तपासले असता ज्या व्यक्तीला लक्ष देण्यात सांगितले त्यांने त्या मुलीला खांद्यावर झोपवून रूग्णालयाच्या बाहेर जाताना दिसुन आल्याने याप्रकरणी संगीता गौङ यांनी सरकारवाङा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
पोलिसांनी फुटेजवरुन तपास सरकारवाडा पोलिसांनी लागलीच तपास चक्र फिरवत मुलीला शोधण्यासाठी ठिकठिकाणी पथके रवाना केली होती. तपास सुरू असताना आज पहाटे एका बाळाला घेऊन एक माणूस सीबीएस परिसरातून जात असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याची माहिती घेत असताना हा माणूस “तोच” अपहरणकर्ता असल्याची खात्री पोलिसांना झाली. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चिमुकलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button