2018 च्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची गृहमत्र्यांकडे ट्विटरद्वारे मागणी
चांदवड
उदय वायकोळे
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 10 हजार पोलीस शिपाई पदे भरली जाणार अशी माहिती देण्यात आली आहे.मात्र 2018 साली झालेल्या पोलीस भरती मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे देशसेवेची संधी द्यावी अशी मागणी उमेदवारांमधून होत आहे. याअगोदर आमदार चिमणराव पाटील,आमदार डॉ राहुल आहेर.
खासदार नवनीत राणा आदींसह लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचेकडे अश्या प्रकारची मागणी केलेली आहे.चांदवड येथील होमगार्ड दत्तात्रय पवार व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी 2018 मधील पोलीस भरती प्रतीक्षा (वेटिंग)यादीतील उमेदवारांना संधी द्यावी अशी मागणी ट्विटर द्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे केली आहे.






