Nashik

येवल्यात आमदार गोपीचंद पङळकर यांचा जाहीर निषेध.

येवल्यात आमदार गोपीचंद पङळकर यांचा जाहीर निषेध.

नाशिक प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक-आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती केलेल्या टिकेनंतर येवल्यात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारत त्या प्रतिमेचे दहन करून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार रोहिदास वारुळे,पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी देण्यात आले.

भाजपा चे विधानपरिदषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बेताल वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले. या वेळी संपर्क कार्यालयाचे प्रमुख बाळासाहेब लोखंडे, जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष राधाकीसन सोनावणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, साहेबराव मढवई,प्रकाश वाघ, शहरध्यक्ष दीपक लोणारी, अकबर शहा, सचिन कळमकर, जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर, विजय खोकले, मोहन शेलार, प्रवीण बनकर, निसार शेख, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, अविनाश कुक्कर, संजय सोमासे, विशाल परदेशी, मुशरिफ शाह, योगेश सोनावणे, गणेश गवळी, प्रदीप सोनावणे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button