Amalner

Amalner: तालुक्यातील सरपंच उपसरपंचांचे प्रलंबित मानधन मिळावे यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन..

Amalner: तालुक्यातील सरपंच उपसरपंचांचे प्रलंबित मानधन मिळावे यासाठी गटविकास अधिकारी यांना निवेदन..

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे प्रलंबित मानधन देण्यात यावे, अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली
आहे. यासंदर्भात तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे बऱ्याच महिन्यापसून मानधन प्रलंबित आहे सर्व गावगाडा चालविणाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, आमदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, चेतन पाटील वाघोदे, दिनेश पाटील पिंपळे बु, किशोर पाटील आर्डी, पायल पाटील निंभोरा, मधुकर पाटील उपसरपंच सुंदरपट्टी, उषाबाई पाटील उपसरपंच आर्डी, भागवत पाटील पिंपळे खु, कौशल्या बाई पाटील वाघोदे, कैलास पाटील लोण, रामकृष्ण पाटील तरवाडे, वैशाली पाटील निसर्डी, अशोक पाटील भरवस, भारती पाटील सबगव्हान यांच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button