Rawer

गौरखेडा ग्रामपंचायतीचे निवडणुकीत ७ जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात निवडणूकीत चुरशीची लढत..

गौरखेडा ग्रामपंचायतीचे निवडणुकीत ७ जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात निवडणूकीत चुरशीची लढत..

मुबारक तडवी रावेर

रावेर : कुंभारखेडा.ता. रावेर येथील ग्रामपंचायतची निवडणूक येथे एकूण तीन वार्डा साठी सात जागा असून 14 उमेदवार रिंगणात उतरल्याने तीनही वार्डात सरळ लढती होणार असल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गौरखेडा येथे तिन्ही वार्ड मिळून एकूण सात जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात उतरले असल्याने सरळ लढती होणार आहेत. त्यात बहुतांशी उमेदवार नवखे असून काही जुने मातब्बर देखील मैदानात असल्याने निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की. त्यात वार्ड क्रमांक एक अनु जमाती महिला राखीव जागेसाठी नशीबा हबीब तडवी व अनु जमाती पुरुष जागेसाठी सलिम रहेमान तडवी, तर ना मा प्र.महिला राखीव जागेसाठी भारती भानुदास पाटील,
हे उमेदवार रिंगणात आहेत.
तर वार्ड क्रमांक 2 मधून अनु,जमाती पुरुष राखीव वसीम ईस्माईल तडवी, व अनु जमाती स्त्री राखीव जागेसाठी बुगा बाई हबीब तडवी लढत आहे.
तर वार्ड क्रमांक 3 मधून अनुसूचित जमाती महिला राखीव जागेसाठी भालेराव ज्योती राजू
तर ना.मा.प्र पुरुष राखीव जागेसाठी नरेंद्र मधुकर पाटील उमेदवार आहेत,
खरा सामना पॅनलच्या प्रमुखांमध्ये यात भाजपचे अहमद तडवी तर काँग्रेसचे गफुर तडवी यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ कोणाच्या बाजूनं कौल देतात व कोण सत्ता काबीज करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तसेच आज हनुमानाच्या मंदिरात प्रचाराचे सर्व उमेदवारांनी आशिर्वाद घेऊन नारळ फोडले, संपूर्ण गावात प्रचार रॅली काढण्यात आली, यावेळी बलदार तडवी, दिनकर पाटील टेलर, गोविंदा पाटील, अनिल पाटील, रविंद्र भालेराव, सुनिल भालेराव, भागवत भालेराव, दिलीप पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, सुधाकर पाटील, देविदास भालेराव, सुधाकर भालेराव, श्रावण भालेराव, जहाबीर तडवी, उस्मान तडवी, छब्बीर तडवी, सादिक तडवी, अर्जुन भालेराव, सुलेमान तडवी, फत्तु तडवी, सागर भालेराव, अजय भालेराव, पंडित भालेराव, जानकी राम पाटील, नरेंद्र पाटील, रविंद्र पाटील,सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button