वाघोदा येथून उद्या कनाशी येथे पदयात्रा होणार रवाना
मुबारक तडवी मोठा वाघोदा
मोठा वाघोदा : मोठा वाघोदा तालुका रावेर येथील संतसेवा फाऊंडेशन वाघोदा बु|| व्दारा पाच दीवसीय पदयात्रा चे आयोजन यांनी केले आहे.श्री कृष्ण ज्ञान मंदिर (मोठा मठ) येथुन दोन फेब्रुवारी वार सोमवार प्रारंम्भ होत असून वाघोदा-बामणोद-भुसावल-गोंभी-वह्राडसिम-हिंगणा-नेरी-शेदूर्णी-अंम्बेवडगाव-पाचोरा-भडगाव-वढदे-कोठली मार्गे स्थानवंदन,प्रसाद वंदन,संतदर्शन, ज्ञान श्रवन समाज प्रबोधन ,करत सात फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र कनाशी येथे समारोप होणार आहे या पदयात्रेला मार्गदर्शन आचार्य मंहत वाघोदेकर बाबा शास्त्री करणार आहेत. तरी जास्तीत जास्त संख्येने या सहभागी व्हावे आयोजकांनी कळवले आहे*






