Chandwad

संत विचार आपल्या द्वारी,हीच पंढरीची वारी-आ.डॉ .राहुल आहेर

संत विचार आपल्या द्वारी,हीच पंढरीची वारी-आ.डॉ .राहुल आहेर

उदय वायकोळे चांदवड

आमदार डॉ.राहुल दौलतराव आहेर आयोजित “संत विचार आपल्या द्वारी,हीच पंढरीची वारी” वारकरी संत पूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त तसेच गेल्या दोन वर्षांपासून कोरोना या महामारीमुळे वारी होत नसल्यामुळे आमदार राहुल दौलतराव आहेर यांनी हा सोहळा आयोजित केला यात चांदवड व देवळा वारकरी संप्रदायातील तसेच संत,महंत,किर्तनकार या सर्वांचा संत पूजन सोहळा आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पांडुरंगाची मूर्ती, तुळशी माळ,बुक्का,गंधगोळी,वारकरी उपरणे देऊन वारकरी किर्तनकारांचा सत्कार व पूजन करण्यात आला.यावेळी तालुका सर्व महंत जेष्ठ श्रेष्ठ किर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारी न झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून ऑनलाइन प्रवचनमाला ठेवण्यात आले होते.यामुळे संतांचे विचार घरबसल्या भाविकांपर्यंत पोहोचले.या अप्रतिम प्रतिसाद चांदवड देवळा तालुकात मिळाला.
तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प.नवनाथ महाराज गांगुर्डे केले प्रास्ताविकात कार्यक्रमाची सर्व रूपरेषा व संकल्पना सांगितली व वारकरी संप्रदायामधील काही जेष्ठ श्रेष्ठ महनीय मंडळी यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले होते त्यांचे आज सर्व किर्तनाकाराच्या उपस्थितीत सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वारकरी संप्रदाय हा शिस्तप्रिय आहे,संप्रदायाचे कार्यक्रम हे राजकीय नसतात पण हा धार्मिक कार्यक्रम अप्रतिम आयोजित नाशिक जिल्हयात प्रथम आयोजन करून असा आदर्श आज संपूर्ण महाराष्ट्रात चांदवड व देवळा तालुक्यातील सर्व किर्तनकारांचे संत पूजन करून आमदार डॉ राहुल आहेर यांनी केला आहे. त्याचबरोबर चांदवड तालुक्याच्या वतीने जेष्ठ किर्तनकार ह.भ.प.माधव महाराज शिंदे महाराज यांनी सर्व वारकऱ्यांची दोन वर्षापासून वारी न झाल्याची खंत व्यक्त केली.पण आज सर्व वारकऱ्यांना आमदारांच्यामुळे अगदी वारी सारखा अनुभव आला,यासारखे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून वारकरी संप्रदायात एक आगळे वेगळे काम तुमच्यामुळे झाले असे आ राहुल आहेर यांच्या विषयी सर्व वारकऱ्यांच्या वतीने आभार मानले.
त्याच बरोबर देवळा तालुक्याच्यावतीने जेष्ठ किर्तनकार ह.भ.प.पुंडलिक महाराज खडकतळे,यांनी बोलताना यंदा ही वारी नाही घडली खूप दुःख होत आहे परंतु आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांनी आमची या संत पूजन सोहळा ठेवून आम्हाला पंढरीत गेल्यासारखे वाटत आहे अशा आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमदार आहेर यांनी आपल्या भाषणातून
यावेळी वारकऱ्यांची वारी घडली नाही सर्व वारकरी दुःखी आहेत की पांडुरंगाचे दर्शन झाले नाही.पण यंदा पंढरीची वारी ही आज सर्व वारकऱ्यांचे संत पूजन करून माझ्या जीवनात पहिली वारी घडली.त्यामुळे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेही त्यांनी सांगितले.यावेळी देवरगाव येथील ब्र.ह.भ.प.सुजित महाराज,ह.भ.प.तुकाराम महाराज निकम,ह.भ.प.माधव महाराज शिंदे, ह.भ.प.संजयनाना धोंडगे, ह.भ.प.मधुकर महाराज जाधव, ह.भ.प.शिवाजी महाराज आहेर, ह.भ.प.नामदेव महाराज ठाकूर, ह.भ.प.निवृत्ती बाबा काळे, यांच्या सह दोन्ही तालुक्यातील बहुसंख्य जेष्ठ श्रेष्ठ किर्तनकार व महिला किर्तनकार उपस्थित होते. ह.भ.प.सौरभ महाराज यांनी सुत्रसंचलन करून सर्वांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button