Dhule

?धुळे Live…धुळ्यात दुकानांच्या वेळेत बदल..!हा आहे नवीन वेळ..!जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…!

?धुळे Live…धुळ्यात दुकानांच्या वेळेत बदल..!हा आहे नवीन वेळ..!जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…!
जळगांव विषाणूमुळे (COVID-19) उदभवणा-या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव प्रसारित केलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी व राज्यात करोना विषाणुमुळे (COVID-19) उदभवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तब आपत्कालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात कोरोनाबविषाणु (कोविड-19) ची संसर्ग साखळी तोडण्याचे अनुषंगाने मार्गदर्शक सुचनांचे अनुषंगाने इकडील दि.15 मे 2021 नुसार प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे व दि.20 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये अत्यावश्यक बाबी अतिरिक्त निबंधासह सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेत सुरु ठेवण्यात आलेल्या आहेत.
तथापी स्थानिक लोकप्रतीनिधी, व्यापारी असोसिएशन, यांचे मागणी नुसार व पोलीस अधिक्षकन सकाळी 07.00 ते 11.00 या वेळेमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु
असलेल्या दुकानावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असुन त्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नागरी क्षेत्रामध्ये अत्यावश्यक बाबींकरीता सदर वेळेमध्ये अंशत: बदल करणे आवश्यक
नगरपंचायत या क्षेत्रात “ब्रेक दे चेन” बाबत दि.20 एप्रिल 2021 व दि.07 मे 2021 च्या आदेशामधील अत्यावश्यक सेवांच्या
वेळेत दि.24/05/2021 पासुन सकाळी 07.00 ते सकाळी 11.00 ऐवजी सकाळी 09.00 ते दुपारी 01.00 वाजेपावेतो सुरु राहतील असा अंशात: यदल करण्यात येत आहे. तसेच इतर ग्रामीण क्षेत्रात अत्यावश्यक सेवांच्या वेळेत काहीही बदल करण्यात येत नसुन तो पुर्वीच्या आदेशानुसार सकाळी 07.00 ते 11.00 हाच राहील.
तरी या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (COVID-19) उपाययोजना नियम 2020 च्या नियम ।। नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार व आपत्ती
प्यवस्थापन कायदा 2005, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आणि साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीप्रमाणे फोजदारी कारवाईस पात्र राहतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button