Chalisgaon

लोकसहभागातून जलसंधारणाचा अभिनव आदर्श उपक्रम…

लोकसहभागातून जलसंधारणाचा अभिनव आदर्श उपक्रम…

रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व रोटरी क्लब ऑफ चेंबूर(मुंबई) यांच्या आंतर डिस्ट्रिक्ट प्रकल्पांतर्गत डॉ. उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उपयुक्त असा लोकाभिमुख उपक्रम…

नितीन माळे

४३दिवसात अविरतपणे पोकलॅड मशिनच्या माध्यमातून झालेल्या नाला खोलीकरण व रुदीकरण कामामुळे करोडो लिटर जलसाठा निर्माण होणार आहे,
चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मणशेवगे, रांजणगाव, पळासरे, भऊर, लोंजे, शेवरी शिवार येथे मिशन पाचशे कोटी लिटर पाणी साठा उपक्रमाद्वारे रोटरी क्लब चाळीसगाव अंतर्गत रोटरी कंमुनिटी कॉर्पस(RCC) च्या माध्यमातून व रोटरी क्लब ऑफ चेंबूर च्या दातृत्वाने व सेवा सहयोग संस्था, पुणे याच्या माध्यमातून मिळालेल्या पोकलॅन्ड मशीनद्वारे लाॅकडाऊन असल्याने कुठलाही गाजावाजा न करता हा भागीरथी प्रयत्न यशस्वी रीत्या पूर्णत्वास नेण्यात आला. व शेतकरी बांधवाच्या शेतीच्या बांधालगत असलेल्या मातीबांध खोलीकरण व रूदीकरणाचे काम मा. उज्वल कुमार चव्हाण जाईन्ड डायरेक्टर (ई.डी), पाणपाटील
तुषार निकम,शेखर निंबाळकर,पंकज पवार,शशांक अहिरे,एकनाथ माळतकर, सचिन राणे, सविता राजपूत (नगर सेविका), आरस्ता माळतकर,प्रा.आर.एम.पाटील,रविंद्र वाघ,हेमंत मालपुरे,प्रा.एम डी देशमुख, दयाराम सोनवणे
यांनी ६ महिने प्रशिक्षण घेऊन गावागावात नालाखोलीकरण + रुंदीकरण करण्यासाठी टीम उभारल्यात.त्या होणाऱ्या कामालाच नाव दिले, ‘मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा’ यांच टिमच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी (ब्राह्मण शेवगे), शेखर निंबाळकर(रांजणगाव) याचे अथक प्रयत्नांमुळे *दि.१७ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन २९ मे २०२० दरम्यान ४३ दिवसात रोटरी क्लबच्या माध्यमातून २४ दिवसात ३१० तासात ८१२८० घनमिटर काम झाले यातून फक्त एका पावसात चक्क ८ कोटी लिटर पाणी साठा निर्माण झाला आहे. तर सेवा सहयोग संस्थेमार्फत १९ दिवस २०५ तासात ३१५६० घनमिटर काम होऊन तीन कोटी लिटर पाणी साठा एका पावसात झाला आहे. ब्राम्हणशेवगे व नाईकनगर शिवारात तब्बल ४३ दिवस ५१५ तासात ११२८४० घनमिटर काम होऊन एका पावसात ११ कोटी लिटर पाणी साठा होऊ शकतो.

या जलसंधारणाच्या सातत्यपुर्ण सुरू असलेल्या कामामुळे गावातच नव्हे तर संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात उच्चांकी काम झाले. कारण संपुर्ण जग कोरोना च्या पार्श्वभूमीवर घरात असताना येथील शेतकरी भारावल्यागत ४४-४५ डिग्री तापमानात स्वतः आपल्या शेतालगत असलेल्या माती बांध खोलीकरण व रूदीकरण करून घेण्यासाठी डिझेल टाकून ऊभा राहून तांत्रिक पणे स्वतः ईजिनिअर प्रमाणे कुठल्याही शासकीय मदतीची वाट पाहत न बसता कोरोनाचे संकट बाजूला सारुन आपल्या शेतालगतचे काम, आपले स्वतःचे काम समजुन रात्रदिवसाची तमा न बाळगता झपाटल्यासारखं प्रत्येकाने काम करून घेतले. कुठलाही हेवा नाही मान – पाण नाही. राजकारण नाही. त्यामुळे येथे न भुतो न भविष्यती असे उच्चांकी व आदर्श घेण्यासारखे काम उभे राहिले व अजूनही अखंडित पणे सुरूच आहे. या कामाचे शासकीय मुल्ये पाहिले तर खर्च अगदी लाखात तर काम करोडो रुपयांच्या घरात तर जलसाठा ही करोडो लिटर होणार आहे. शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा का म्हणतात याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.

आपल्या शेतालगतचा लोकसहभागातून नाला खोलीकरण,रुदिकरन स्वतः शेतकरी करणे हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण असावे. अतिशयोक्ती वाटेल पण हे वास्तव आहे. *याचा पाचशे हेक्टर शिवारातील शेतकरी बाधवाना फायदा होणार आहे*. ब्राह्मणशेवगे , नाईकनगर, रांजणगाव, पळासरे, भऊर या गावात झालेला जलसाठा हा शाश्वत आणि चिरकाल पाणी प्रश्न मिटविणारा आहे. या संपूर्ण उपक्रमात रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव चे अध्यक्ष डॉ संदीप देशमुख, सचिव रोशन ताथेड, रोटे संग्रामसिंग शिंदे, रोटे भास्कर पाटील, रोटे राजेंद्र कटारिया, तसेच रोटरी क्लब ऑफ चेंबूर(मुंबई) चे समन्वयक रोटे सुरेश भोसले, रोटे झा साहेब, आदी मान्यवरांचे तसेच मिशन 500 कोटी लिटर जलसाठा उपक्रमाचे संकल्पक डॉ उज्जवल कुमार चव्हाण, पांच पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

अश्या उपक्रमाद्वारे च जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगेल असे गौरवोद्गार डॉ उज्ज्वल चव्हाण यांनी काढले तर ह्या उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली येऊन आपण आपला परिसर सुजलाम सुफलाम करू शकतो असे मनोगत रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव चे अध्यक्ष डॉ संदीप देशमुख यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button