Pune

राष्ट्रवादी व आमदार गोपिचंद पडळकर वाद पुन्हा रंगण्याचे संकेत

राष्ट्रवादी व आमदार गोपिचंद पडळकर वाद पुन्हा रंगण्याचे संकेत

दत्ता पारेकर पुणे

पुणे : ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदार निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, असा सवाल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केला आहे. तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली, तर इतका त्रागा का करता, असं म्हणत त्यांनी गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला .

सांगलीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात पडळकर प्रसार माध्यमांशी बोलत होते. ज्या पक्षाचे 4 खासदार निवडून येतात, त्यांना लोकनेता म्हणता, मग 303 खासदर निवडून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचं, तुम्ही मोदींवर टीका करता, मग आम्ही तुमच्यावर टीका केली तर इतका त्रागा का करता, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे.

पदवीधरची निवडणूक ही भ्रष्टाचाराविरोधातील आणि प्रखर जातीयवाद्यांच्या विरोधातील आहे. या टग्यांच्या सरकारच्या विरोधातील ही निवडणूक आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे- चंद्रकांत पाटील
दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल केलेल्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यावर खरपूस टीका करत सुटले आहेत. पुण्यातील एका मेळाव्यात शरद पवारांवर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. “राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी एका मेळाव्यात केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच तोफ डागली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button