Chandwad

एक्स बँड डॉप्लर रडार चांदवड बरोबरच उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचे-भूषण कासलीवाल

एक्स बँड डॉप्लर रडार चांदवड बरोबरच उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचे-भूषण कासलीवाल

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : एक्स बँड डॉप्लर ही अशी एक विज्ञानाची निर्मिती आहे. ज्याने काही तास अगोदरच आपल्याला ढगफुटी, गारपीट आदींची अचूक माहिती मिळते. कृषी व कृषी उद्योगांसाठी अचूक हवामान माहिती गरजेचे आहे. मुंबईसाठी पाच डॉप्लर रडार मंजूर झाले आहेत. यातील एक उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात चंद्रेश्वर डोंगरावर उंच जागी तर मराठवाडासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात पिंपळदरी येथील डोंगरावर बसविणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक परिसरावर यामुळे लक्ष ठेवता येईल आणि त्यामुळे तशी
मागणी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भौतिकशास्त्रज्ञ तसेच हवामान व ढगफुटी तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी केली आहे. एक्स बॅंड डॉप्लर रडार चांदवड बरोबरच उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचे ठरणार आहे म्हणून जनहितासाठी चांदवड येथे सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे चांदवडचे नगराध्यक्ष श्री. भूषण कासलीवाल यांनी कळविले आहे. एक्स बॅंड डॉप्लर रडार साठी आवश्यक अखंड वीजपुरवठा, रडार आॅपरेट करणार्या सर्व कर्मचारी निवासाची व्यवस्था, रडारची सुरक्षितता आणि आवश्यक सर्व गोष्टी आपण वैयक्तिक लक्ष देत तातडीने पुरवू असे ही भूषण कासलीवाल यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंचीवर चांदवड तालुक्यातील चांदरेश्वर डोंगर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे हे एक्स बँड डॉप्लर बसविले तर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्याला याचा लाभ होईल. एक्स बॅंड डॉप्लर रडार मुळे हवामानाची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि आपत्ती व्यवस्थापनांसाठी देखील ते उपयुक्त ठरणार आहे. मान्सून पॅटर्न बदललेला आहे आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचे जिल्हा तसेच तालुका निहाय पावसाचे वितरण बदलले आहे त्याचा सुयोग्य अभ्यास तसेच संशोधन करत शेतकर्यांना शेती व पिकनियोजन करतांना एक्स बॅंड डॉप्लर रडारचा उपयोग होईल.
उत्तर महाराष्ट्र तसेच मुख्यत: नाशिक जिल्हा हा कांदा, भाजीपाला, द्राक्ष आदी फळांची लागवड आणि निर्यात मोठ्या प्रमाणात करणारा जिल्हा आहे. मुंबईतील एक्स बॅंड डॉप्लर रडार वर्ग करुन नाशिक आणि औरंगाबाद या क्षेत्रात मिळवण्यासाठी हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे तसेच यापुढे देखील या प्रोजेक्टसाठी त्यांची मदत घेणार असल्याचे देखील चांदवड शहराचे प्रथम नगराध्यक्ष श्री. भूषण कासलीवाल यांनी सांगितले.

कृषी उन्नती आणि एकंदर महाराष्ट्राच्या विकासासाठी श्री.भूषण कासलीवाल यांनी पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी, केंद्रीय मंत्री मा.श्री. डॉ. हर्षवर्धनजी, खासदार मा. श्रीमती डॉ. भारतीताई पवार, माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे शिफारस केली आहे आणि आवश्यक पाठपुरावा देखील सातत्याने ते करणार असल्याचे देखील चांदवडचे नगराध्यक्ष श्री.भूषण कासलीवाल यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. यंत्रणेचा निश्चित लाभ शेतकर्यांना अचूक हवामान माहिती देणारी एक्स बॅंड डॉप्लर रडार यंत्रणा गरजेची आहे. विज्ञानाने विकसित केलेली ही फार मोठी देण असून जगभर तिचा उपयोग केला जातो. बोटाच्या पेराएवढया लहान भागात देखील किती बाष्प, बर्फ कण व पाणी आहे याची माहिती ही यंत्रणा देते. ढगातील हे लिक्विड वाॅटर कंटेटची अचूक माहिती मिळाली की किती मिलीमीटर पाऊस, कोणत्या ठिकाणी व किती वाजता पडेल हे बिनचूक सांगणे शक्य आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे
प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button