Amalner

शैलजीतची मायेची फुंकर…कमी वयात निभावले सामाजिक उत्तरदायित्व..!

शैलजीतची मायेची फुंकर…कमी वयात निभावले सामाजिक उत्तरदायित्व..!

अमळनेर गोर गरीब मुलांची दिवळीही उत्साहात आनंदात साजरी व्हावी यासाठी कु.शैलजित शिंदे हिने गरीब वस्तीतील मुलांना ग्रिन फटाके आणि खाऊ वाटप करून स्वतःचा जन्मदिवस साजरा केला.
कु.शैलजित रणजित शिंदे हि दरवर्षी आपला जन्मदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करते. कोविड निर्बंधांनंतर प्रथमच सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतांना गोर गरीब मुलांची दिवाळी आनंदात जावी त्यानांही दिवाळीचा जल्लोष करता यावा म्हणून जन्मदिवसाला शहरातील वर्णेनेश्वर मंदिराजवळीत मागास व गरीब वस्तीतील मुलांना जमवून त्यांना ग्रिन फटाके वाटले तर सोबत प्रत्येकाला दिवाळीचा खाऊ हि दिला.यावेळी कु.शैलजित सोबत बहीण कु. कल्पकृती शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, चिन्मय पाटील हे उपस्थित होते.यापूर्वी हि कु.शैलजित ने गरिबांना कपडे वाटप,गरजू महिलांना साड्या वाटप, गरीब विद्यार्थ्याना मिष्टान्न जेवण , रेल्वे स्टेशन, बस स्टँड , रस्त्यांवरील भिकारी, भिक्षुकांना दिवाळी फराळ वाटपसारखे उपक्रम राबवून आपले सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न केलेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button