Maharashtra

मजुरासाठी नामदार विजय वडेट्टीवार यांनी दिला मदतीचा हात शिवानी वडेट्टीवार चिमूर येथे धान्य किट वाटप

मजुरासाठी नामदार विजय वडेट्टीवार यांनी दिला मदतीचा हात ..शिवानी वडेट्टीवार
चिमूर येथे धान्य किट वाटप

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेशवर जुमनाके

जगासह देशात कोरोना विषाणू कोविड 19 मोठ्या प्रमाणात पसरत आहे तेव्हा शासनाने संचारबंदी लागू केली त्यामुळे जनतेला जीवनाशयक वस्तू ची अडचण निर्माण झालेली आहे तेव्हा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या सामाजिक व मानवी सहकार्य च्या भूमिकेतून गोर गरीब जनतेसह मजूर वर्गाला मदतीचा हात दिला असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी जनतेनी आपल्या घरीच राहून प्रशासनाचे आदेश पाळण्याचे सांगितले.
चिमूर तहसील कार्यालयात धान्य किट वाटप प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी जीप सदस्य गजानन बुटके ,जीप सदस्य ममता डुकरे ,नगरसेविका सीमा बुटके ,नगरसेविका कल्पना इंदूरकर, राजू हीगनकर ,सुधीर पंदीलवार ,सुनील दाभेकर ,सचिन पचारे ,प्रमोद दांडेकर ,माधुरी पचारे , तसेच एसडीओ संकपाळ तहसीलदार संजय नागतीळक उपस्थित होते .
चिमूर सह तालुक्यात धान्य किट वाटप करण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button