sawada

सावदा शहरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम जातीय सलोख्याचे दर्शन!

सावदा शहरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम जातीय सलोख्याचे दर्शन!

“सध्या रमजान महिना असून जर बडा अखाडा मस्जिदीत प्राथना सुरु असल्यास त्या दरम्यान सदरील मिरवणूक डिजे बंद करून पुढे नेण्यात येईल,अशी माहिती हिंदू बांधवांन कडून आधी समजली होती.म्हणून मुस्लिम बांधवांनी सुद्धा मिरवणुकीत हिंदू बांधवांना पुष्पगुच्छ व पुष्पमाला देवुन हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.तरी यापुढेही शहरात अशा प्रकारे जातीय सलोखा कायम नांदावे.अशी अपेक्षा यावेळी लोकांनी व्यक्त केली”
———————————————————–
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे निघालेल्या हनुमान जयंतीच्या मिरवणूक दरम्यान हिंदु- मुस्लिमजातीय सलोख्याचे कौतुकास्पद दर्शन आज दि.६ एप्रिल २०२३ रोजी दिसून आले.या हनुमान जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुक ज्यावेळी सावदा येथील चॉंदनी चौकात आली त्यावेळेस सदरील हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नयन अत्तरदे,उपाध्यक्ष हेमंत चौधरी,सचिव तुषार बोंडे,कौशल धांडे,अक्षय सरोदे,बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रतिक भिडे उर्फ विक्की,जिल्हा गो-रक्षा प्रमुख चंदन इंगळे,प्प्पू जोगी,भैय्या चौधरी या हिंदू बांधवांचे शेख फरीद शेख नुरोद्दीन,युसूफ शाह सुपडू शाह,रशीद बिस्मिल्ला बागवान यांच्यासह मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत पुष्पगुच्छ व पुष्पमाला देवुन हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.हे प्रसंग पाहून मिरवणुकीत उपस्थित हिंदू बांधवांनी आनंदी होऊन टाळ्या वाजवल्या यामुळे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम जातीय सलोख्याचे स्पष्ट दर्शन दिसून आले.याप्रसंगी सावदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहा.पोलीस निरीक्षक जालींदर पळे,पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाहाले व फिरोज खान पठाण उपस्थित होते.
तसेच आज शहरात हनुमान जयंती सह सालाबादप्रमाणे मरीआईच्या यात्रेनिमित्त सायंकाळी ६ वाजता भक्तीमय वातावरणात भगत गणेश गोपाळ चौधरी यांनी बारागाड्या ओढल्या या धार्मिक उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.यावेळी सहा.पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबाहाले, एएसआय अन्वर तडवी,पोलीस का.उमेश पाटील पाटील,महजर पठाण,गोपनीय विभागाचे देवेंद्र पाटील,यशवंत टाहाकळे व पोलीस स्टाप सह गृहरक्षक दलातील महीला व पुरुष जवान यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button