Bollywood Stories: बापरे..! 4 लग्न, 2 अफेयर तरी शेवटी एकाकी जीवन जगला हा अभिनेता ओळखलं का..?
सोशल मीडियावर दररोज नवीन एका सेलेब्सचा बालपणीचा फोटो व्हायरल होत असतो. सध्या देखील सोशल मीडियावर असाच एक बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा अभिनेता त्या काळातील सर्वोत्कृष्ट दिसणारा अभिनेता म्हणून ओळखला जात होता. सध्या या अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याकाळाच प्रत्येक अभिनेत्रीला या अभिनेत्यासोबत काम करायचे होते. आपल्या कारकिर्दीत सुपरहिट ठरलेल्या इंडस्ट्रीतील मोजक्या स्टार्सपैकी तो एक होता, पण त्याची लव्ह लाईफ सुपरफ्लॉप होती. या अभिनेत्याला आयुष्यात एकदा नाही तर 4 वेळा प्रेम झाले आणि प्रेमात धोका देखील मिळाला. असं म्हटलं जातं की, 2 अफेअर्स आणि 4 लग्नानंतरही शेवटी त्यांनी आयुष्य एकट्यांनी काढले. या निरागस मुलाने वयाच्या 10 व्या वर्षी सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि आपल्या काळातील सर्वात यशस्वी स्टार्सपैकी एक होता. पण, त्यांने लवकरच या जगाचा निरोप घेतला. तुम्ही या मुलाला ओळखलंत का?
जर तुम्ही अजूनही या चिमुकल्या मुलाला ओळखत नसाल तर तुम्हाला आणखी काही हिंट देतो. त्या काळातील आघाडीची अभिनेत्री बिंदिया गोस्वामीसारख्या हिट अभिनेत्रीशी त्यांनी लग्न केले होते. फोटोत दिसणारा मुलगा दुसरा कोणी नसून 60 आणि 70 च्या दशकात यशाची शिखरे गाठणारा विनोद मेहरा आहे, हे आता तुम्ही ओळखले असेलच.
विनोद मेहरा यांचे फिल्मी करिअर जेवढे यशस्वी होते, तेवढेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्य गुंतागुतीचे होते. विनोद मेहरा यांचे नाव रेखा यांच्याशी नेहमीच जोडले गेले. त्यावेळी विनोद आणि रेखा विवाहित असल्याचीही चर्चा होती, पण अभिनेत्याच्या आईने हे नातं कधीच स्वीकारलं नाही. कुटुंबामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी कधीच आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केले नाही. यानंतर घरच्यांच्या दबावाखाली विनोद मेहरा यांनी किरणसोबत लग्न केलं, पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.
त्यानंतर विनोद मेहरा बिंदिया गोस्वामीयांच्या प्रेमात पडले. दोघांनी लग्नही केलं. मात्र, पहिल्या पत्नीशी झालेल्या भांडणामुळे बिंदियाने विनोद मेहरासोबतचे नाते तोडल्याचे बोलले जाते. यानंतर विनोदने किरण नावाच्या मुलीशी लग्न केलं, तेव्हा विनोदला वाटलं की आयुष्यातील एकटेपण आता संपला आहे.
परंतु, हेही दोन वर्षे चालले. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. विनोद मेहरा हे इंडस्ट्रीतील असे स्टार होते ज्यांचा चेहरा आजही लोकांच्या मनात आहे.

त्यांचे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात.






