सावदा येथे सत्ताधारी गटाचे सदस्याचे बाचाबाची नंतर पालिकेच्या विविध विषय समित्यांची बिनविरोध निवड.
युसूफ शाह सावदा
सावदा : सावदा येथील नगरपालिकेत विविध विषय शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक. स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य. पाणी पुरवठा व जलसंधारण. नियोजन आणि विकास. महिला व बालकल्याण. समिती सदस्यांची निवड मा, जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशानुसार सावदा नगर पालिकेची विशेष सभा आज दी. 5 रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर सभा पालिकेच्या सभागृहात ऑनलाईन कॉनफरनसिंग चे माध्यमातून घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी म्हणून, श्वेता संचेती तहसीलदार मुक्ताईनगर होते. त्यांचे सोबत साहयक म्हणून मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे उपस्थितित मुख्य कार्यालय पार पडली. प्रारंभी सत्ताधारी गटातील नगरसेविका नंदाबाई यांनी त्यांचेच गटनेत्याना अनेक प्रश्न विचारले वरून बैठकीत काही काळ बाचाबाचीत गेल्या नंतर बैठक सुरू झाली. दरम्यान विशेष सर्वसाधारण सभेत शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सदस्य पदी- रंजना भारंबे, नंदाबाई लोखंडे, सगीरबी सय्यद तुकडू, मिनाक्षी कोल्हे. यांची निवड करण्यात आली.
स्वच्छता वैद्यकीय आणि आरोग्य समिती- सदस्य पदी जयश्री नेहते, शबाना तडवी, सगीरबी सय्यद तुकडू, राजेश वानखेडे यांची निवड करण्यात आली.
पाणीपुरवठा व जल निःसारण समीती- सदस्य पदी सतिष बेंडाळे, अजय भारंबे, फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण व सिध्दार्थ बडगे याची निवड झाली.
नियोजन आणि विकास समीती – सदस्य पदी लिना चौधरी, शबाना तडवी, नंदाबाई लोखंडे, फिरोजखान पठाण व सिध्दार्थ बडगे यांची निवड करण्यात आली.
महिला व बालकल्याण समिती – सदस्य पदी करुणा पाटील, नंदाबाई लोखंडे, मिनाक्षी कोल्हे, यांची बिनविरोध निवड झाली आहे.दरम्यान नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांचे सह विस न. पा. सदस्यांची बैठकीसाठी उपस्थिती होती.बैठकित दोन्ही गट नेत्यांनी नामनिर्देशनसाठी नावे सुचविण्यात आली होती. यावेळी न. पा. कर्मचारीवर्गाने बैठकीसाठी परीश्रम घेतले.






