Baramati

बारामतीत फासेपारधी समाज आघाडीचे आंदोलन

बारामतीत फासेपारधी समाज आघाडीचे आंदोलन

प्रतिनिधी- आनंद काळे

बारामती- फासेपारधी समाज्याच्या विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात शुक्रवारी बारामतीत रिपब्लिकन पक्षाशी(आठवले गट) संलग्न पारधी समाज आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले.

सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही फासेपारधी समाज्याच्या मागण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप निवेदनात केला आहे.फासेपारधी समाज्याला गावनिहाय शासकीय जागेत किंवा गावठाणात घरकुले बांधून द्यावीत,कसण्यासाठी गायरान किंवा शासकीय जमीन द्यावीत,या समाज्याला मोफत अन्नधान्य मिळावे,शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल तर ते कायम करून त्यांना शासकीय योजनेतून घरकुल उभारून द्यावे.

सोनकसवाडी येथील भूदानाची जमीन फासेपारधी समाज्याला विभागून द्यावी,शासकीय योजनांचा लाभ व विनातरण कर्ज मिळावे,जेष्ठ व्यक्तींना श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्यासाठी प्रांत कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते.
विविध मागणी संदर्भात निवेदनावर पुणे जिल्हा पारधी आघाडीचे जिल्हाधक्ष पुरुषोत्तम पवार,पुणे जिल्हा आरपीआय(आठवले गट) उपाध्यक्ष विष्णू भोसले यांच्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button