Maharashtra

विनाकाराण फिरणाऱ्या दुचाकी होईल जप्त

विनाकाराण फिरणाऱ्या दुचाकी होईल जप्त

प्रतिनिधी अमोल राजपूत

वालचंदनगर:इंदापूर तालुका
येथील करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमुळे वालचंदनगर संचारबंदी लागू असतानाही कोणी विनाकारण दुचाकी घेऊन रस्त्यावर फिरत असेल,तर कायदेशीर कारवाई करण्याबरोबर,दुचाकीही लाॅकडाऊन काळ संपेपर्यंत जप्त करण्याचा आदेश पुणे जिल्ह्य ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी वालचंदनगर पोलिसांना सुचना दिल्या.अत्यावश्यक सेवा आणि अतिमहत्वांच्या कामांसाठी बाहेर पडलेल्यांना या कारवाईतून वगळणार असल्याची माहिती पुणे जिल्ह्य ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

दरम्यान,आदेश मिळाल्यापासुन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी कडक कारवाई करणास सुरूवात केली अवध्या २४ तासात बुधवार दुपारपासून गुरुवारी दुपार पर्यंत वालचंदनगर जंक्शन चौक परिसरात दुचाकी तीन व चार चाकी गाडी जप्त केल्या. दुचाकीवर फिरणाऱ्या ८ अधिक जणांवर गुन्हे दाखल केल्याचे व ड्रोन कॅमेरेव्दारे गुन्हा दाखल होणार वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, बारामती-इंदापूर वालचंदनगर- भिगवण या चार प्रमुख रस्त्यावर दुचाकींची वर्दळ वाढली आहे. आवाहन करूनही नागरिक रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे पोलीसांनी कारवाई सुरू केली आहे.

रस्ते ,चौकाचौकांत बंदोबस्त
याबाबत पुणे जिल्ह्य पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, की रस्त्यांवरील गर्दी दिवसेंदिवस वाढत असल्याने विनाकारण फिरणायांची दुचाकी जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्य होता आहे. वरीष्ठ अधिकायांनी आपआपल्या ठाण्याच्या हद्दीत वरील कारवाई काटेकोरपणे करण्याच्या सुचना दिल्या आहेत. सर्वच प्रमुख रस्ते व गावागावांतील चोक अशा ठिकाणी पोलीसांचे पथक तैनात केले. अत्यावश्यक सेवा आणि अतिमहत्वांच्या कामांसाठीच बाहेर पडलेल्यांना कारवाईतुन वगळणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button