नेहरू युवा केंद्राकडून जोपासली सामाजिक बांधिलकी
प्रतिनिधी सुरेश बागडे
कोरोना संसर्ग रोगामुळे देशभरात लॉक डाउन घोषित करण्यात आला असून या काळामध्ये गरजू कुटूंबाना अन्नधान्य पुरवठा सुरळीतपणे मिळावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, (आपत्ती व्यवस्थापन शाखा) उस्मानाबाद यांच्या आदेशानुसार नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार)अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी परंडा तालुक्यामध्ये कार्यरत स्वयंसेवक यांच्या सहकार्याने १०अन्नधान्य किट्स तहसिल कार्यालय परंडा येथे जमा करण्यात आले.व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून
तुम्ही,तुमचे मित्र,युवा मंडळ,ग्रुप,
प्रतिष्ठाण,संस्था,तुमचं गाव व ग्रामपंचायत मिळून देखील ही मदत करू शकता असे आवाहन नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद,परंडा तालुका समन्वयक रणजीत महादेव पाटील यांनी केले होते. या व्हाट्स अँप आवाहनाला प्रतिसाद देत युथ बार्शीकर ,बार्शी ,
धनंजय पाटील तासगाव-सांगली ,
स्माईल फाउंडेशन बार्शी,श्रीमंतराजे छावा जन्मोत्सव सोलापूर,श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी,छत्रपती शासन ग्रुप,मुगाव यांच्या कडून अन्नधान्य किट्स त्वरित मदत मिळाली असे पाटील यांनी सांगितले.परंडा तहसील कार्यालय नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक अधिकारी मिलिंद गायकवाड साहेब यांच्या उपस्थिती मध्ये १० अन्नधान्य किट्स जमा केले आहेत.तहसीलदार गायकवाड साहेब यांनी अन्नधान्य किट्स मदत करण्यात आलेल्या समाजसेवकांचे सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत तसेच नेहरू युवा केंद्र स्वयंसेवक रणजीत महादेव पाटील यांच्या पुढाकाराने ही मदत तहसिल कार्यालयापर्यंत पोहचवली याबद्दल पाटील यांचेदेखील आभार व्यक्त केले.त्याचबरोबर हे अन्नधान्य किट्स गरजू लोकांपर्यंत पोचले जाईल असे आश्वासन दिले.






