चोपडा:-(प्रतिनिधी-सचिन जयस्वाल)——-भाजपचे नवनिर्वाचित प्रभारी शहराध्यक्ष रवी मराठे यांच्या सत्कारानिमित्त काल शहरातील शासकीय विश्रामगृह येथे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या नवनिर्वाचित प्रभारी शहराध्यक्ष रवी मराठे यांच्या निवडीदरम्यान दि २ रोजीची झालेल्या बैठकीत झालेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी बुधवारी संध्याकाळी ६ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यात प्रभारी शहराध्यक्ष रवी मराठे आणि भाजपचे विधानसभा विस्तारक प्रदीप पाटील यांनी भाजप चे महिला जिल्हा उपाध्यक्ष ताराबाई पाटील यांचे सुपुत्र निलेश पाटील यांच्या आरोपावर खुलासा करत खंडन केले.
यावेळी रवी मराठे भाजपचे नवीन प्रभारी शहराध्यक्ष म्हणाले की मी सर्व क्षेत्रात काम करणारा माणूस आहे ,पैसे देऊन पद विकत घेणार मी नाही आणि माजी ती परिस्थिती ही नाही …माझ्या वडिलोपार्जित कोणी राजकारणात नाही…मी प्रामाणिकपणे लोकसभा निवडणुकीत काम केले म्हणून दखल घेत पक्षाने मला ही जबाबदारी दिली आहे .निलेश पाटील यांनी हा विषय आमच्या पर्यंत ठेवायला पाहिजे होता…त्यांनी नाराजी माझ्या जवळ किंवा पक्षाकडे व्यक्त करायला हवी होती .त्या गोष्टींचा मला राग नाही.. मी निलेश पाटील यांच्या घरी जाऊन समजावण्याचा प्रयत्न करणार तसेच शहराध्यक्ष ची निवड वरिष्ठ पातळीवरून होते. मागील आठ महिन्या पासून या पदासाठी मी प्रयत्नशील होतो.असे मत रवी मराठे यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले..
तसेच त्यानंतर भाजपचे चोपडा तालुका विधानसभा विस्तारक प्रदीप पाटील यांनी सांगितले की ..सार्वजनिक जीवनात काम करत असताना मला कोणत्याही प्रकारचा पैसा नको ..मी गेल्या २२ वर्षांपासून पक्षाचे काम करत आहे.मी घरचा शेतकरी कुटुंबातील असून सधनशील आहे..असल्या पैशाची मला गरज नाही. कालचे माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत त्याबद्दल मी त्यांना कायदेशीर मानहानीची नोटीस पाठविली आहे..त्यांच्या घरात अगोदरच त्यांच्या आई ताराबाई पाटील ह्या भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी यापदावर आहेत.एकाच घरात दोन पदे कसे जातील.आठ वर्षापासून त्यांच्या घरातील चालणारे कामांचा लेखाजोखा काढल्याशिवाय राहणार नाही असे हि यावेळी प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
या पत्रकार परिषदेत प,स,सभापती आत्माराम म्हाळके,भाजपचे जेष्ट नेते तिलक शहा, विस्तारक प्रदिप पाटील, नूतन शहर अध्यक्ष रवींद्र मराठे,माजी शहर अध्यक्ष राजू शर्मा,मगन बाविस्कर, मुन्ना शर्मा,दीपक बाविस्कर, पंकज पाटील,जे,के,थोरात, सुनिल सोनगिरे, तुषार पाठक,प्रकाश पाटील,मनीष पारीख,डॉ, मयूर अग्रवाल, राकेश पाटील,धीरज सुराणा,डॉ, दिनेश सोनवणे, यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते..







