Nandurbar

दारु पिवुन वाहन चालविणाऱ्यांविरोधात नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई

दारु पिवुन वाहन चालविणाऱ्यांविरोधात नंदुरबार पोलीसांची धडक कारवाई

नंदुरबार फहीम शेख

मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत असे निदर्शनास आले की, मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होत आहे ही बाब चिंताजनक असल्यामुळे दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरुध्द् नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहिमेचे दिनांक 04/12/2021 रोजी आयोजन करण्यात आले होते दिनांक 04/12/2021 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत चारचाकी व दुचाकी मोटार सायकल चालकांची अचानक तपासणी केली असता काही वाहन चालकांनी मद्यपान केलेले आढळुन आले, त्यामुळे त्यांचे विरुध्द् वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने नवापुर पोलीस ठाणे-09, शहादा पोलीस ठाणे- 03, धडगांव पोलीस ठाणे 02, शहर वाहतुक शाखा, नंदुरबार – 04 नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-02, नंदुरबार शहर पोलीस ठाणे-08, विसरवाडी पोलीस ठाणे 04, अक्कलकुवा पोलीस ठाणे – 03, तळोदा पोलीस ठाणे- 02, सारंगखेडा पोलीस ठाणे-01, उपनगर पोलीस ठाणे – 02, मोलगी पोलीस ठाणे-02 म्हसावद पोलीस ठाणे-01, असे एकुण 43 गुन्हे मद्यपी चालकांवर नोंदविण्यात आले. तसेच त्यांचे लायसन्स देखील रद्द करण्याची प्रक्रीया करण्यात येणार आहे याशिवाय आगामी सण उत्सवाच्या काळात देखील नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अचानक दुचाकी व चारचाकी वाहन चालकांची तपासणी करुन दारु पिऊन वाहन चालवितांना आढळुन आल्यास त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल असे मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठी देखील धोकेदायक आहे. नागरीकांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button