World

बापरे..!बारा तासात दोन मोठ्या नेत्यांची हत्या..!राजकीय वर्तुळात खळबळ..!दुसऱ्यांचे गेम वाजवणारे “तुमचेही”गेम वाजू शकतात..!

बापरे..!बारा तासात दोन मोठ्या नेत्यांची हत्या..!राजकीय वर्तुळात खळबळ..!दुसऱ्यांचे गेम वाजवणारे “तुमचेही”गेम वाजू शकतात..!

केरळात बारा तासात दोन मोठ्या राजकीय नेत्यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केरळ मधील अलप्पूझा जिल्ह्यातील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष शान केएस यांचा काल शनिवारी रात्री खून करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या 8 तासात भारतीय जनता पार्टीचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची हत्या झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाजपचे नेते रंजीत श्रीनिवासन हे आज सकाळी मॉर्निंग वाकला गेले होते ते घरी परतत असताना आठ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यातील काहींनी त्यांना चाकूने भोसले यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीनिवासन समर्थकांची गर्दी झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता रंजीत श्रीनिवासन हे भाजपा ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव होते. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई यांनी या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button