Mumbai

?️ कंगनाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने; मुंबई हायकोर्टने बीएमसी ला फटकारले..

?️ कंगनाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने; मुंबई हायकोर्टने बीएमसी ला फटकारले..

अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील तोडकामाच्या कारवाईच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं बीएमसीची ही कारवाई अवैध ठरवली आहे.

महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही रद्द करतानाच, ते कार्यालय महापालिकेला पूर्ववत करून द्यावे लागेल,’ असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. कंगनाने कार्यालयात केलेल्या बांधकामावर महापालिकेने केलेली कारवाई ही अत्यंत घाईने आणि वाईट हेतूने, सूडबुद्धीने केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आधी धमकी व इशारा दिला. त्यानंतर महापालिकेने अत्यंत तत्परतेने कारवाई केली.यावरून प्रशासनाचा कुहेतू होता. वैयक्तिक द्वेषापोटी कायद्याचे पालन न करता कारवाई केली हे स्पष्ट होते, असं निरीक्षण न्यायालायनं नोंदवलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button