Pandharpur

विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यायामाची गरज- राष्ट्रीय खेळाडू यश चव्हाण

विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच व्यायामाची गरज- राष्ट्रीय खेळाडू यश चव्हाण

लोटस इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहास सुरुवात

प्रतिनिधी रफिक आत्तार

पंढरपूर- ‘विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच शारीरिक व्यायामाची गरज असते आणि हा व्यायाम खेळातून मिळतो. यासाठी शालेय विद्यार्थ्याना अशा खेळाची आवड निर्माण होण्यासाठी सातत्याने क्रीडा स्पर्धा भरविणे आवश्यक आहे. यातूनच भविष्यात एखादा आंतर राष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊ शकतो.’ असे प्रतिपादन सुवर्णपदक विजेते बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू यश चव्हाण यांनी केले.
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रसिव एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहास सुरुवात झाली. या प्रसंगी सुवर्णपदक विजेते बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू यश चव्हाण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते तर सुवर्णपदक विजेती किक बॉक्सिंगची राष्ट्रीय खेळाडू अक्षीता कदम या देखील उपस्थित होत्या. स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ.सुधाकर पडवळ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी सई शिंदे या विद्यार्थीनीने क्रीडा सप्ताहाची शपथ दिली. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मशाल ज्योतीचे प्रज्वलन आणि ध्वजवंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मार्च पास सादर केले तसेच खेलो इंडिया गीत, अरेबिक्स डान्स, चिकन डान्स, मराठमोळी लेझीम, सादर करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रम अधिक रंगतदार केला. विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहित करण्याकरिता पालकांनी देखील संगीत खुर्चीत सहभाग घेतला. महिला संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये ज्योती या पालक विजयी झाल्या तर पुरुष संगीत खुर्चीमध्ये प्रकाश शेटे हे पालक विजयी झाले. दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये हॉलीबॉलचा सामना खूपच अटीतटीचा झाला. यामध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थी विरुद्ध इयत्ता नववीचे विद्यार्थी यांच्यात रंगलेल्या सामन्यात आठवीच्या विद्यार्थ्यांचा अवघ्या दोन गुणांनी विजय झाला, तसेच कब्बडीमध्ये देखील झालेल्या इयत्ता आठवी विरुद्धच्या सामन्यात इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीनीचा दोन गुणानी विजयी झाला तर प्राथमिक विभागात इयत्ता तिसरी विरुद्ध इयत्ता चौथीचा खो-खोच्या सामन्यात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. सर्व विजयी विद्यार्थ्यांचे स्कूलचे सचिव डॉ.बी.पी. रोंगे, अध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच. एम. बागल, संस्थेचे खजिनदार दादासाहेब रोंगे, संस्थेचे पदाधिकारी, पालक वर्ग, प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. यावेळी पालक प्रतिनिधी शिवदास ताड गुरुजी, अस्मिता वाडदेकर, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक हृदयनाथ नामदे आणि जान्हवी दीक्षित यांनी केले तर सागर शिंदे यांनी आभार मानले.
छायाचित्र- कासेगावच्या लोटस इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाची सुरुवात क्रीडा मशाल पेटवून झाली. याप्रसंगी प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण, स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ.सुधाकर पडवळ, खजिनदार दादासाहेब रोंगे, बॉक्सिंगचे राष्ट्रीय खेळाडू यश चव्हाण व विद्यार्थी प्रतिनिधी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button