टीबी रोग हरेगा देश जितेगा अशी भावना व्यक्त केली भारती प्रवीण पवार कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार
विजय कानडे
नवभारतात क्षयरोग निर्मुलनात लवकरच उल्लेखनीय कार्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुष्मान भारत या जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य योजनेअंतर्गत क्षयरोगाचं उच्चाटन करण्यासाठी देशातली सर्व आरोग्य केंद्र एकत्रित रीत्या कार्य करत आहेत. कोविड १९ च्या विरोधात भारतानं दिलेल्या लढ्यामधून भारताचा आरोग्य क्षेत्राबाबतचा गंभीर दृष्टिकोन दिसून येतो, असं त्या म्हणाल्या. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला हे लक्षात घेऊन आजाराची लक्षणं दिसताच रुग्णाने उपचार घेण्यासाठी त्वरित रुग्णालयात जावं, असं आवाहन त्यांनी केलं.
‘टीबी हारेगा, देश जितेगा’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न नक्कीच साकार होईल, असा दृढ विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वात आजचा दिवस उल्लेखनीय आहे. क्षयरोगाची शिकार झालेल्या लाखो लोकांचं आयुष्य वाचवणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं मांडविय म्हणाले. दूरदृश्य प्रणालीद्वारेहोत असलेल्या या कार्यक्रमात देशभरातील स्वयंसेवी संस्था राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसंच उद्योग विश्वातील प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक सहभागी झाले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री राज्यमंत्री भारती पवार, विविध राज्यांचे राज्यपाल तसंच राज्यांचे आरोग्यमंत्री दुरदृश्यप्रणालीद्वारे या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले.






