sawada

सावदा शहर शिवसेनेची निवेदनाद्वारे रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सावदा शहर शिवसेनेची निवेदनाद्वारे रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :-दि. २५.१२.२०२१ रोजी दुपारी ४ ते ४:३० वाजेच्या सुमारास एका न्यूज पोर्टल वर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे- खेवलकर यांनी आमदारांना मारण्याची भाषा केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांना मारण्याची चिथावणीखोर भाषा वापरल्याने संपूर्ण जळगांव जिल्ह्यात एकच खळबळ उडाल्याने सदर प्रकरणाबद्दल जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील शहर शिवसेनेच्या वतीने नुकतेच सावदा पोलिस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले असता त्यात असे म्हटले आहे की, तमाम जनतेचे लोप्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तीच्या जीवितावर खडसे कुटुंबीय उठलेले दिसून येते. म्हणून ह्या अतिशय वैफल्यग्रस्त झालेल्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांचेवर चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी सावदा शहरप्रमुख भरत नेहेते,सुरज परदेशी उर्फ (बद्री),धनंजय चौधरी,विश्वनाथ कोळी,मनीष भंगाळे,किरण गुरव, शेख नाजीम शेख नजीर,हुसैन भाई चायवाले, शाहरुख तडवी,अशरफ तडवी,गणेश माळी,रितेश पंडित,मंगेश माळी,रितेश मस्कावडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button