लातूरचे बालाजी सुळ ,आपल्या विनोदी शैलीतून करत आहेत कोरोना विषयी जनजागृती
लातुर प्रतिनिधी प्रशांत नेटके
लातूरचे सुपुत्र व स्टार प्रवाह चॅनेल वरील एक टप्पा आऊट विजेता फेम प्रसिद्ध विनोदी कलाकार बालाजी सुळ हे फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करत आहेत.
सध्या भारतासह संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना या भयंकर आजारामुळे संपूर्ण देशाची अवस्था बिकट झाली आहे. इतर देशाची झालेली अवस्था पाहता आपल्या भारतासह महाराष्ट्रात लॉकडाऊन महत्वाचे आहे असे मत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. व संपूर्ण जनतेला घरीच बसून राहण्याचे आदेश दिले .अशावेळी घरी बसून राहणाऱ्यासाठी कोरोनाच्या भीतीपासून थोडीशी मुक्ती मिळावी आणि शहरी असो वा ग्रामीण भागातील लोकांना कोरोना विषाणू विषयी जनजागृती व्हावी या चांगल्या हेतूने लातूरचे कलाकार बालाजी सुळ गेल्या काही दिवसांपासून फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून घरात बसून जनतेला मनोरंजनात्मक प्रबोधन करत आहेत
कोरोनावर मात करता यावी यासाठी सर्वजण घरी बसून आहेत,त्या सर्वासाठी मनोरंजन विरंगुळा म्हणून महाराष्ट्राचे विशेषतः लातूरचे विनोदवीर कलाकार बालाजी सुळ यांच्या संकल्पनेतून ‘घरी बसूया, थोडं मनोरंजन करूया ‘ या विनोदी फेसबुक लाईव्ह चा प्रबोधनात्मक कार्यक्रम करण्याचे ठरवले.
*नका घेऊ कोरोनाची धास्ती ,घरी बसून करू मौज मस्ती*
त्यांच्या या समाजोपयोगी मनोरंजन प्रबोधनाला सोशल मीडियामधून संपूर्ण महाराष्ट्रातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.






