Chandwad

चांदवड शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा स्तरावरून जमा केलेल्या कोविड -१९ जनसहाय्यता निधी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे जमा

चांदवड शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा स्तरावरून जमा केलेल्या कोविड -१९ जनसहाय्यता निधी तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे जमा
उदय वायकोळे चांदवड
चांदवड : आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळा व कळवण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चांदवड तालुक्यातील स्व.मा.आ.जयचंदजी दी. कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा खेलदरी,अनुदानित आश्रमशाळा खडकजांब व शासकीय आश्रमशाळा पारेगाव यांच्या वतीने एकूण 49000/- रुपये रक्कम covid काळात मदतनिधी म्हणून मा.प्रदीप पाटील तहसीलदार चांदवड यांच्याकडे देण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील कोगिड -१९ कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या विकट परिस्थिती मध्ये रुग्णांना आवश्यकतेनुसार औषधोपचार , मेडिसीन , ऑक्सिजन वायू व अन्य अत्यावश्यक साधनांचा पुरवठा होण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे . अनेक ठिकाणी आवश्यक साधनांचा तुटवडा निर्माण झालेला असून सद्यस्थितीस राज्यावर आर्थिक संकट ओढवलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार ऑक्सिजन , मेडिसीन व अन्य अत्यावश्यक साधनाथा पुरवठा होणे गरजेचे आहे या हेतूने आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्प कळवण कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चांदवड आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक , अधिक्षक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद याचेद्वारा मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वेच्छेने , स्वयप्रेरणेने मदतकार्य म्हणून कोविड -१९ जन सहाय्यता निधी रक्कम ४९,००० / – उभारण्यात आला असून. सदर निधी आपण तालुका स्तरावर तहसीलदार यांचे कडे जमा करण्यात आला. हा निधी मा.तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली निधीचा विनियोग सुयोग्यरित्या करण्याचे विनंती आदेश मा.विकास मीना साहेब आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी(भा.प्र.से.) यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button