महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपणाच्या इशाऱ्यानंतर पिंपळगाव टोल नाका प्रशासनाची मुदतवाढ मिळण्यासाठी विनंती
नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे
नाशिक – :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिप पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना निफाड तालुक्याच्या वतीने पिंपळगाव टोल प्लाझा येथे पिंपळगाव बसवंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील रस्त्यावर पडलेला खङङयांबाबत दिनांक ०७ सप्टेंबर २०२० रोजी निवेदन देऊन सात दिवसात रस्त्यांवरील खड्डे न बुजवल्यास खड्ड्यात वृक्षारोपणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना निफाड तालुक्याच्या वतीने पिंपळगाव टोल प्लाझा येथे भेट दिल्यावर टोल नाका अधिकाऱ्यांच्या विनंती नुसार टोल नाका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी पाटील साहेब, शशांत आडके साहेब, टोल नाका प्रशासनाचे जाधव साहेब, कंत्राटदारांचे रस्ते दुरुस्ती इन्चार्ज कुशारे साहेब हे उपस्थित होते. टोल प्रशासन अधिकाऱ्यांनी पावसाळ्यामुळे रस्ते दुरुस्तीस होत असलेल्या दिरंगाई बद्दल दिलगिरी व्यक्त करून पावसाळा संपताच सात दिवसात रस्ते दुरुस्तीचे काम करण्यात येईल असे आश्वासन देत मुदतवाढ मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळास विनंती केली. या वेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर पावसाळा संपताच रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी मुदतवाढ देण्यात आली.
यावेळी निफाड तालुका अध्यक्ष शैलेश शेलार, प्रवक्ता राजेश तापकीरे, ओझर शहराध्यक्ष शामराव उगले, पिंपळगाव शहर अध्यक्ष राजेंद्र भवर, संजु मोरे, शिवमूर्ती खडके, उपाध्यक्ष नीलेश सोनवणे, तालुका उपाध्यक्ष केशव काका वाघ, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पिंपळगाव शहराध्यक्ष गिरीश कसबे, चंद्रकांत शिंदे, विकास कुरणे, सुनील आंबेकर, कचेश्वर दत्तात्रय आहेर, विकास शिवाजी शेलार, धनंजय गोरख साळुंखे, जितेंद्र लदेल, राजाभाऊ खडके, योगेश मोरे, दत्तू पवार, संजय मोरे, जयेश ढिकले, संग्राम दाभाडे, विनोद शेलार, शिवाजी महाले, प्रशांत कोरङे, राजेंद्र मोरे हे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.






