रावेर

अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागात शासनाकडून तात्काळ मदती सह इतर सुविधा मिळव्यात- श्रीराम पाटील

अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागात शासनाकडून तात्काळ मदती सह इतर सुविधा मिळव्यात- श्रीराम पाटील

रावेर विलास ताठे
जळगाव जिल्ह्यात यावर्षी वरुणराजाच्या अवकृपेने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ऐन दिवाळीत तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. आणि कर्ज फेडीचे स्वप्न रंगवीत असतांनाच त्यांचे घरच उध्वस्त झाले आहे. त्याला शासनाने त्वरित मदद करून विविध सुविधा निर्माण करवून देण्याची मागणी श्रीराम फौंडेशन अध्यक्ष श्रीराम पाटील व पदाधिकारी यांनी केली आहे
अतिवृष्टीमुळे शेतीवर आधारित इतर जोड व्यवसाय करणारे व्यावसायिक देखील अडचणीत आले असून त्यांची उधारी देखील बुडण्याच्या मार्गावर आहे.

भविष्यात शेतकरी आत्महत्या सोबतच शेतीवर आधारित उद्योजक यांच्यादेखील आत्महत्या होवू शकतात तरी नुकसानग्रस्त भागाची शासनाने पाहणीसह पंचनामे करून शेतकरी सोबतच शेतीवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचा देखील आढावा घेवून शासन स्तरावर मदद मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे यावेळी त्यांचे सोबत उपाअध्यक्ष स्वप्नील पाटील,सचिव दीपक नगरे, राजु चौधरी, बंडू पाटील , संतोष महाजन, घनश्याम पाटील , योगेश पाटील, प्रदीप पाटील, दीपक भांबरे, ललित चौधरी
चेतन पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button